• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार बडनेर्‍यातील दारोकार भावंड पोल्ट्री व्यवसायात यशस्वी

Team Agroworld by Team Agroworld
April 27, 2019
in यशोगाथा
0
पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार  बडनेर्‍यातील दारोकार भावंड पोल्ट्री व्यवसायात यशस्वी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

छोटीशी सुरवात देखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरु शकते, हा विश्वास रुजविण्यात बडनेरा (जि. अमरावती) येथील दारोकार भावंड यशस्वी झाले आहेत. कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याकरीता अवघ्या दीड हजार पक्ष्यांपासून पोल्ट्री व्यवसायाची सुरवात करणार्‍या दारोकार यांच्याकडील पक्ष्यांची संख्या आज 15 हजारांवर पोचली आहे. सातत्य आणि चिकाटीने त्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला.

आशिष दारोकार यांचे वडील मोहनराव यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता. तर मोहनराव यांचे वडील सूर्यभान हे कुटुंबीयांची शेती सांभाळत होते. दरम्यान सुर्यभान यांच्या निधनानंतर शेतीचे सुत्रे मोहनराव यांनी सुरवातीला काही वर्ष पारंपरिक पिके घेतली. त्यानंतर आशिषकडे शेतीचे सुत्रे आल्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला.

भाजीपाला उत्पादन
बाजाराची मागणी आणि हंगाम लक्षात घेऊन भाजीपाला पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार सद्या त्यांच्या शेतात एका एकरावर वांगी लागवड केली आहे. लग्नसराई तसेच धार्मिक उत्सवात वांग्याची भाजी करण्याला प्राधान्य राहते, त्यामुळे वांग्याचे मार्केट लक्षात घेत आता वांगी लागवडीवर भर देण्यात आल्याचे आशिष सांगतो. त्यासोबतच बरबटी शेंग, कोथींबीर यासारखी पीक घेतली जातात. ज्यावेळी भाजीपाला पिकाला मार्केट नसल्याचे लक्षात येते त्यावेळी पावसाळी मूग घेण्यावर त्यांचा भर राहतो.

पोल्ट्रीमध्ये रोवले पाय
वर्ष 2005 साली शेतीला अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत असावा याकरीता पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आशिष याने कृषी डिप्लोमा केला आहे. त्यातील माहिती आणि प्रात्यक्षिक अनुभवाच्या आधारे त्याला हा व्यवसाय करणे अवघड नव्हते. चुलतभाऊ पंकजचे सहकार्य त्याने या व्यवसायाकरीता घेतले. दोघांनी मिळून सुरवातीला दीड पक्ष्यांच्या संगोपनावर भर दिला. पुणे येथील एका पुरवठादारांकडून पक्ष्यांची त्यावेळी खरेदी होत होती. बॉयलर आणि गावरान पक्ष्यांचे दोन दोन बॅच त्यावेळी काढल्या जात होत्या. 2014-15 पर्यंत अशाप्रकारच्या बॉयलर आणि गावरान पक्ष्यांची विक्री होत होती.

मार्केटींगचा फंडा
ठोक विक्री करणार्‍या बडनेर्‍यातील स्थानिकांना व्यवसायाच्या सुरवातीला किरकोळ विक्री होत होती. त्यांच्या माध्यमातूनच या क्षेत्रातील व्यापारी व वितरकांची माहिती कळाली. त्यांच्याशी नंतर मोबाईलवरुन संपर्क साधण्यात आला. व्यापार्‍यांकडून त्यावेळी मागणी वाढू लागली; त्यामुळे व्यवसाय वाढ करण्याचे या भावंडांनी ठरविले. टप्याटप्याने ही वाढ करण्यात आली आणि 2007 मध्ये गावरान कोंबड्यांकरीता अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा फार्म म्हणून या भावंडांच्या व्यवसायाने परिसरात लौकीक मिळविला होता. हैदराबाद किंवा लातूर परिसरातून गावरान पक्ष्यांची त्यावेळी खरेदी केली जात होती, असे आशिष सांगतो.

वेगळा पर्याय निवडला
सुरवातीला स्वतः किरकोळ विक्री केली. त्यानंतर व्यापार्‍यांच्या माध्यमातून विक्रीचा पर्याय आणि आता कंपनीद्वारे एक दिवसाच्या पक्ष्यांचा पुरवठा आणि संगोपनानंतर विक्री असा करार पद्धतीचा पॅटर्न त्यांनी राबविला आहे. नागपूर येथील एका कंपनीशी हा करार केला आहे. दर चाळीस दिवसांनी सरासरी 2200 ग्रॅम वजन मिळाल्यानंतर कंपनीद्वारे पोल्ट्री फार्मवरुन पक्षी विक्रीसाठी नेले जातात, असा करार हा करार आहे. यासाठी साडेसात ते आठ रुपये प्रती किलो असा दर कंपनीकडून दिला जातो.

कंपनी आणि शेतकरी करार
करार पद्धतीत कंपनीकडून एक दिवसाचे पक्षी, पशुखाद्य तसेच लसीकरणाकरीता लागणार्‍या औषधींचा पुरवठा होतो. व्यवस्थापन केवळ शेतकर्‍याला करावे लागते. आज दारोकार भावंडांकडून सुमारे 15 हजार 500 पक्ष्यांचे संगोपन या करार पद्धतीतनुसार केला जाते. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहते; परिणामी या कालावधीत पोल्ट्रीतील पक्ष्यांचे संगोपन जिकरीचे ठरते. त्यामुळे सद्या 15 हजार 500 एवढीच पक्ष्यांची संख्या असल्याचे आशिषने सांगितले. इतरवेळी सुमारे 19 हजार पक्ष्यांचे संगोपन त्यांच्या शिवारात होते. त्या क्षमतेचे शेड उभारण्यात आले आहे.

शेडची उभारणी
दारोकार यांच्याकडे 19 हजार 500 चौरस फुट आकाराचे शेड आहेत. यातील आशिष दारोकार यांचे शेडचा आकार 100 बाय 30 फुटाचा असून ते 12 हजार चौरस फुटाचे आहे. शेडच्या उभारणीवर सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे ते सांगतात. पंकज दारोकार यांच्याकडील साडेसात हजार चौरस फुटाचा शेड आहे. 20 लाख रुपयांचा खर्च या शेडच्या उभारणीवर झाला आहे. शेडच्या उभारणीसाठी चांगल्या प्रतीचे लोखंडी पाईप आणि जाळीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शेडच्या किंमती वाढल्याचे ते सांगतात. शेडच्या परिसरात थंडावा कायम राहावा याकरीता पोल्ट्री शेड असलेल्या परिसरात वृक्षारोपणावरही भर दिला गेला आहे. दोन शेडच्या मधात लिंबूची काही झाडेही लावली आहेत. लिंबूपासून भविष्यात पैसे मिळतील आणि परिसरात गारवाही राहील असा दुहेरी उद्देश त्यामागे आहे.

उन्हाळ्यात विशेष काळजी
पोल्ट्री फार्म तसेच शेती असलेल्या परिसरात दोन विहिरी आणि एका बोअरवेलचा पर्याय आहे. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्यापार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसायीकांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानुसार शेडचे वातावरण राखले जावे याकरीता आशिष व पंकज दारोकार यांनी पोल्ट्री शेडच्या वरील बाजूस स्प्रिंकलर लावले आहेत. दुपारी 11 ते सायंकाळी पाच यावेळात ते सुरू ठेवले जातात. शेडच्या जाळी असलेल्या भागात ग्रीन नेट तसेच बारदाना लावला जातो. अशाप्रकारच्या उपचारातून तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न होतो. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यास बल्ब आणि हिटरच्या माध्यमातून पक्ष्यांना आवश्यक तेवढे तापमान शेडमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा आणि हिवाळ्यात पक्ष्यांची खास काळजी घ्यावी लागते, असे ते सांगतात.

मजूराच्या मुलीचे शिक्षण
पोल्ट्री फार्मच्या व्यवस्थापनाकरीता दोन मजूर कुटुंबाची कायमस्वरुपी नियुक्त केली आहे. 12 हजार रुपये महिना या मजूर कुटुंबाला देतात. मुळचे मध्यप्रदेशातील असलेल्या यातील एका मजूर कुटुंबात तीन मुली आहेत. त्यातील एका मुलीच्या इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा खर्च दारोकार करतात.


संपर्क ः

  • आशिष दारोकार मो.नं. 9421601381
  • पंकज दारोकार मो.नं. 9890881650

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कंपनी आणि शेतकरी करारपोल्ट्री व्यवसायभाजीपाला उत्पादन
Previous Post

गाडेकर यांची पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये नियंत्रित शेती -पडिक शेतीत आधुनिकतेने उत्पादन

Next Post

संत्रा प्रक्रिया उद्योगाची उभारणी

Next Post
संत्रा प्रक्रिया उद्योगाची उभारणी

संत्रा प्रक्रिया उद्योगाची उभारणी

ताज्या बातम्या

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish