देशात युरियाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. सरकारी मालकीच्या खत कंपन्यांना 25 मार्च 2025 पर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
देशातील युरियाचा वार्षिक वापर सुमारे 360 लाख टन आहे. त्यातील सुमारे 80 लाख टन परदेशी बाजारातून आयात केली जाते. गेल्या वर्षी देशात 357 लाख टन युरियाचा वापर झाला होता.
युरियाचा वापर लक्षात घेऊन, त्याचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्राने सरकारी खत कंपन्यांना परदेशातून युरिया खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. इंडिया पोटॅश लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपन्यांना ही परवानगी दिली गेली आहे.
याशिवाय, देशाला खताच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी नॅनो युरियाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.