कलर वापरल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत
कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडी म्हणजेच बुढीका बालमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरिंगवर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
कर्नाटक राज्य सरकारच्या अलीकडील चाचणीत 171 कोबी मंचुरियन नमुन्यांपैकी 107 आणि कॉटन कँडीच्या 25 पैकी 15 नमुन्यांमध्ये आरोग्यास हानीकारक कृत्रिम, अखाद्य रंग आढळला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.
कर्नाटकात रोडामाइन बी या कलरिंग एजंटच्या वापरावर बंदी घातली आहे. हा एक रासायनिक डाय रंग आहे. कपडे, कागद, चामडे, छपाई आणि प्लास्टिक यांना लाल व गुलाबी रंग देण्यासाठी तो वापरला जातो. त्यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते, श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकते. याशिवाय, कॅन्सरचाही धोका असतो.
त्यामुळे यापुढे टपरी, ठेल्यांवरील तसेच हॉटेल्समधील लाल रंगाच्या चमचमीत चायनीज मंच्युरियनपासून दूरच राहा.