मुंबई : राज्यातील काही भागात अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असतांना कापूस उत्पादक शेतकर्यांसमोर आणखी एक संकट उभे टाकले आहे. कापसाच्या पिकावर मररोग पडू लागला आहे. त्यामुळे रोपांची मुळे पांढरी पडून पिके कोमजत आहेत.
पावसाने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील हवामान विभागाचा अंदाज चुकवत शेतकर्यांचा हिरमोड केला आहे. उशिरा का होईना मात्र, पाऊस येईल, अशी आशा शेतकर्यांना असतांना अद्याप राज्यातील काही भागात पावसाने पाहिजे तसी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे. ज्या शेतकर्यांनी आधीच तसेच पहिल्या एक-दोन पावसानंतर कापसाची लागवड केली आहे, अशा शेतकर्यांसमोर देखील संकट उभे राहिले आहे. कापसाला मररोगाची लागण झाल्याने पाने गळून पिके कोमजत आहे.
आपत्कालीन परिस्थिती असे करा पीक नियोजन
https://eagroworld.in/crop-planning-as-an-emergency-situation/
शेतकर्यांनो ही करा उपाययोजना
पीक कोमजत असल्याने अनेक शेतकर्यांकडून अॅग्रोवर्ल्डकडे यावर काय उपाययोजना करावी, अशी विचारणा केली जात आहे. अॅग्रोवर्ल्डने देखील काही तज्ज्ञांची चर्चा करून यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत मार्गदर्शन मागितले. त्यावर काही तज्ज्ञांनी दिड किलो युरिया आणि दिड किलो पोटॅश 100 लिटर पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण तयार करुन ते ड्रेन्चिंग पद्धतीने फक्त बाधित रोपांना द्यावे. जी रोपे बाधित नाहीत त्यांना ड्रेन्चिंग करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.