केरळच्या किनारपट्टी भागात सध्या ईशान्य मान्सून सक्रीय झालेला दिसत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानसह दक्षिण-पूर्व राजस्थानवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणीय प्रणालीमुळे राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसात राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. कोकणासह मुंबई-ठाणे, नाशिक-पुणे, संभाजीनगर-नागपूर आणि एकूणच राज्यभरातील रात्री-पहाटेचे तापमान कमी झालेले आहे. उलट रात्री आणि सकाळी हवेत गारठा जाणवत आहे. नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानात आणखी घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
मोबाईल स्टार्टरचा वापर करा आणि घर बसल्या विद्युत पंप सुरु करा। Mobile Starter।
कोल्हापूर, सिंधुदुर्गसह शेजारील जिल्ह्यात पावसाची शक्यता
अरबी समुद्रात केरळ किनार्याजवळ निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्टा सध्या कोकण किनार्यालगत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामानातील बदल तसेच दक्षिण भारतात सक्रिय झालेल्या ईशान्य मोसमी पावसामुळे पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहू शकते. गोव्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्गसह शेजारील जिल्ह्यात पावसाची शक्यता शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या परिसरात येत्या दोन-तीन दिवसात कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. या सोबतच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार आणि आंध्र प्रदेशमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात कुठे पाऊस तर कुठे तापमानवाढ
एकूणच, केरळच्या समुद्र किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या वातावरण प्रणालीमुळे, येत्या काही दिवसात राज्यातील काही भागामध्ये पाऊस तर काही भागांमध्ये तापमानात वाढ असे वातावरण दिसू शकेल. त्यातच हिमालय व उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यांचा जोर सध्या कमी झाला आहे. राज्याच्या दिशेने बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर अधिक दिसत आहे. परिणामी, राज्यभरातील किमान तापमानामध्ये एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
झटका मशीनचा वापर करा व वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा ।Jhataka Machine।
नोव्हेंबर महिन्यात तुलनेने कमी गारठा राहण्याचा अंदाज
“स्कायमेट”ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीनजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या परिसरातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने हवा दमट झाली आहे. त्यामुळेच या भागात येत्या दोन-तीन दिवसात मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई-पुण्यासह तसेच राज्याच्या काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोचरी थंडी जाणवत आहे. राज्यासह देशभरात या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात राज्यभरात सरासरीच्या तुलनेने कमी गारठा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.