नवी दिल्ली : सध्या जगभरात धक्कादायक हवामान बदलामुळे (Climate Change) दिल्लीत दीर्घकाळ उष्ण हवामान राहण्याची शक्यता 30 पटीने वाढली आहे. ग्लोबल वॉर्मिगबाबत (जलवायू परिवर्तन) जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
औद्योगिक क्रांतीपूर्वी दिल्ली आजच्यापेक्षा किमान एक अंश थंड असावी, असा अंदाजही जागतिक हवामान संघटना (वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायाझेशन, डब्ल्यूएमओ WMO)ने या अहवालात व्यक्त केला आहे. ‘युनायटेड इन सायन्स’ या नव्या अहवालात हे तथ्य सांगण्यात आले आहे.
मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी ; असा घ्या मधकेंद्र योजनेचा लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/TgyUpPxd5Ao
या वर्षी उष्णतेचा अहवाल
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, या वर्षी मार्च ते मे दरम्यान दिल्ली कमालीची उष्ण होती. दिल्लीतील कमाल तापमान पाच दिवस सुरू राहिलेल्या उष्णतेच्या लाटेत विक्रमी 49.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. या तापमानाने शहरातील निम्म्या लोकसंख्येला त्रास दिला. विशेषतः अनधिकृत, कमी उत्पन्न असलेल्या निवासी विभागात आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या वर्गाला याचा सर्वाधिक त्रास झाला.
अहवालानुसार, भविष्यात जगभरातील 1.6 अब्जाहून अधिक लोकांना 35 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ब्रिटन, युरोपमध्ये त्याची झलक दिसून आली. अहवाल सांगतो, की 2050 पर्यंत, 970 हून अधिक शहरांमध्ये राहणाऱ्या 1.6 अब्जाहून अधिक लोकांना नियमितपणे किमान 35 अंश सेल्सिअस तापमानाचा अनुभव घ्यावा लागेल.
डब्ल्यूएमओच्या मते, गेल्या 50 वर्षांमध्ये हवामानाशी संबंधित आपत्तींची संख्या पाच पटीने वाढली आहे, ज्यामुळे सरासरी 115 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दररोज 202 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अहवालात असे दिसून आले आहे, की हरितगृह वायूंचे (ग्रीन हाऊस इफेक्ट) प्रमाण विक्रमी उच्चांकावर जात आहे. लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या घसरणीनंतर जीवाश्म इंधन उत्सर्जनाचे (कार्बन एमिशन) दर आता महामारीपूर्व पातळीच्या वर आहेत.
गेली सात वर्षे राहिली सर्वात उष्ण
अहवालात असे निदर्शनास आले आहे, की 2030 पर्यंत 1.5 डिग्री सेल्सिअसने उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य पुरेसे नाही. ही महत्त्वाकांक्षा पॅरिस कराराच्या प्रतिज्ञापत्रात आहे. मात्र लक्ष्यापेक्षा आता सात पट जास्त वायू उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे. कारण गेली सात वर्षे सर्वात उष्ण होती.
1850-1900 च्या सरासरीपेक्षा किमान पुढील पाच वर्षांतील वार्षिक सरासरी तापमान तात्पुरते 1.5 अश सेलसियसने जास्त असण्याची 48 टक्के शक्यता आहे. डब्ल्यूएमओने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्लोबल वार्मिंग जसजसे वाढत आहे, तसतसे हवामान प्रणालीमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमकुवत लोकसंख्येला अधिक त्रास
अहवालानुसार, कोट्यवधी लोकांचे निवासस्थान असलेल्या आणि मानवी उत्सर्जन 70 टक्क्यांपर्यंत असलेल्या शहरांना वाढत्या सामाजिक-आर्थिक प्रभावांना सामोरे जावे लागेल. अहवालात, या वर्षी जगातील विविध भागांमध्ये झालेल्या तीव्र हवामानाची उदाहरणे दिली आहेत. त्यानुसार, सर्वात असुरक्षित लोकसंख्येला सर्वात जास्त त्रास होईल. पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, भीषण वादळे आणि जंगलातील आग अशा घटना सतत वाढत चालल्या आहेत.
भयावहपणे वारंवारतेचे रेकॉर्ड मोडले जात आहे. उदाहरणार्थ, युरोपमधील उष्णतेच्या लाटा, पाकिस्तानमध्ये तीव्र पूर, चीनमध्ये दीर्घकाळापर्यंत तीव्र दुष्काळ, भारतातील तुंबाणारी शहरे, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अमेरिका! या आपत्तींच्या नवीन स्केलबद्दल काहीही नैसर्गिक नाही. या वर्षीचा ‘युनायटेड इन सायन्स रिपोर्ट’ सूचित करतो, की हवामानाचे परिणाम जगाला विनाशाकडे घेऊन जात आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
Comments 2