अनुवांशिकरित्या सुधारित अशा मका आणि सोयाबीनच्या 81 GM बियाण्यांना चीनकडून मान्यता देण्यात आली आहे. यात मक्याच्या 64, तर सोयाबीनच्या 17 वाणांचा समावेश आहे. चिनी जीएम खाद्यान्न अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या पसंतीस उतरलं आहे.
वाढत्या जागतिक मागणीमुळं मका, सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी आता चीननं कंबर कसली आहे. याआधी 2016 मध्ये जीएम कॉर्न बियाणे चोरल्याबद्दल चिनी नागरिकांना अमेरिकेत दोषी ठरवलं गेलं होतं. अगदी अलीकडे, 2020 मध्येही FBI नं अशा प्रकरणात चौकशी केली होती. मात्र, भूतकाळातील संकोचातून मुक्त होऊन चीननं आता नव्या वाणांचं संशोधन, विकास आणि चाचणी यावर भर दिला आहे. दुसरीकडं, भारतानं आतापर्यंत फक्त बीटी कापसाला परवानगी दिली आहे. बीटी वांगी आणि जीएम मोहरी कोर्टात अडकून पडले आहेत.
ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन 11 एप्रिल । राज्यात 3 दिवस पावसाचे; गारपिटीचा इशारा, रेड अलर्ट!