• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेळ्यांना पावसाळ्यात होणारे रोग व घ्यावयाची काळजी…

Team Agroworld by Team Agroworld
September 23, 2019
in तांत्रिक
0
शेळ्यांना पावसाळ्यात होणारे रोग व घ्यावयाची काळजी…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आंत्रविषार
हा प्रादुर्भावातून उद्भवणारा जिवाणूजन्य आजार आहे. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर ऊबदार वातावरणात हे जिवाणू मातीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढतात. प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चार्‍यावर चरणार्‍या, मांसाने भरीव असणार्‍या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात पिलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात.


उपाय योजना –
मेंढ्यांना शिफारशीत लस द्यावी. तीन महिन्यांवरील वयोगटातील कोकरांनादेखील लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो, श्वास घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाय योजना –
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.
जरबा ः हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंपासून होतो. याचा प्रसार चावणार्‍या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्यात पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते.
लक्षणे –
तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात. फुफ्फुसदाह होऊन मेंढ्या मरतात. यात मरतुकीचे प्रमाण पाच ते वीस टक्के आहे. या आजारातून बर्‍या झालेल्या मेंढ्यांना अशक्त, कमकुवत कोकरे निपजतात.
उपाय योजना –
पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून मेंढ्यांचे तोंड धुवावे.
बुळकांडी
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाय योजना –
पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
पायलाग
पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्या या पायलाग आजारास लवकर बळी पडतात. आर्द्र हवामान व ओलसर माती प्रसारास कारणीभूत ठरते. खुरे मऊ होणे, खुरांना सूज येणे, दुर्गंधी येणे, खुरांतून रक्त येणे, खुरांत खपल्या होणे, मेंढी लंगडणे, ताप येणे, वजन कमी होणे, खूर गळून पडणे, काळजी न घेतल्यास खुरांत अळ्या पडणे, भूक नाहीशी होणे, अशक्तपणा येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
उपाय योजना –
लसीकरण वेळापत्रक
रोग महिना मात्रा (शेळी)
फुफ्फुस दाह जानेवारी 2 मि.लि. कातडीखाली
घटसर्प मार्च- सप्टेंबर 5 मि.लि. कातडीखाली
देवी एप्रिल कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली)
आंत्रविषार मे- नोव्हेंबर 5 मि.लि. कातडीखाली
बुळकांडी मे- नोव्हेंबर 1 मि.लि. कातडीखाली
फर्‍या जुलै 5 मि.लि. कातडीखाली
लाळ्याखुरकत ऑगस्ट 5 मि.लि. कातडीखाली

1) वाढलेली खुरे कापून योग्य निगा राखावी. 2) दररोज लेंडी लोटून वाडग्याची स्वच्छता राखावी. 3) पंधरा दिवसांतून एकदा वाडग्यात चुन्याचा सडा द्यावा. 4) मेंढ्यांना मूत्र व लेंड्या साठलेल्या जागी ठेवणे टाळावे. 5) लंगडणार्‍या मेंढ्या कोरड्या जागेत इतर मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवाव्यात. 6) मेंढ्यांना दररोज दहा टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणातून चालत घेऊन जावे. 7) कायम लंगडणार्‍या मेंढ्या विकून टाकाव्यात. 8) लंगडणार्‍या मेंढ्या विक्रीनंतर, तीन आठवड्यांनंतर नवीन मेंढ्या कळपात समाविष्ट कराव्यात. 9) खुरे पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवावीत.
जंत : शेळ्यामध्ये तीन प्रकारचे जंत आढळतात
1) पट्टी कृमी
2) पर्णकृमी
3) गोलकृमी
यासाठी जनावरांना पुढीलप्रमाणे औषध द्यावीत. जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अलबेंडाझाँल 5 मि. ग्रॅम प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्यावे. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होतो. यावेळी शेळ्यांना पातळ संडास होते.
शेळ्यांना इंजेक्शन देणे
शेळ्यांना होणार्‍या आजारावर बर्‍याच वेळा इंजेक्शन दयावे लागते. पण पशु चिकित्सक लवकर उपलब्ध होत नाही किंवा उशिरा येतात, त्यामुळे कधीकधी आपल्याला आर्थिक नुकसान होते. म्हणजेच शेळी दगाऊ शकते. शेळीपालन करतांना आपल्याला शेळीला होणार्‍या आजारांवर कोणते इंजेक्शन दयावे लागते, हे माहीत असते. पण इंजेक्शन देता येत नसल्यामुळे नाईलाज असतो. जर आपण स्वतःच शेळीला इंजेक्शन दिले तर शेळीचे प्राण वाचवु शकतो. वारंवार सराव केला तर आपण सुद्धा शेळीला इंजेक्शन देऊ शकतो.
इंजेक्शन देण्यासाठी योग्य औषधांची माहिती आणि योग्य उपकरणांची माहिती असणे फार आवश्यक आहे. शेळीला इंजेक्शन देण्याआधी आपण संत्री फळावर सराव करू शकतो. कारण शेळीची मांसपेशी आणि कातळी ही संत्र्याच्या सालीसारखी असते.
इंजेक्शन देण्याचे दोन प्रकार आहेत. एक र्डीलर्लीींरपर्शेीी (डट) आणि दूसरे खपीींर्राीीर्लीश्ररी(खच्). इंजेक्शन देण्याअगोदर इंजेक्शनवर डट किवा खच् हे लिहिलेले असते. आधी ते वाचावे व मगच इंजेक्शन दयावे.
Subcutaneous (SQ) पद्धत-
ही एक सोपी पद्धत आहे. कारण या पद्धतीत इंजेक्शन रक्त वाहिनी किंवा नसांमध्ये जाण्याची भीती नसते. कारण ह्या प्रकारात इंजेक्शन त्वचेच्या खाली द्याव्याचे असते. शेळीच्या खांद्याच्या सैल त्वचेचा भाग हा चिमटीमध्ये उचलून मंडपासारखा भाग तयार करावा. सुई ही कातळीमध्ये घुसवावी. सुई टाकत असताना ती मांस पेशीला लागणार नाही, याची काळजी घ्यावी. ह्या प्रकारात करडांना इंजेक्शन देणे फार कठीण असते. कारण करडांची कातळी ही सैल नसते. त्याकरिता करडांच्या समोरच्या पायाच्या बगलेत आपण सुई देऊ शकतो. इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागेवर मसाज (चोळावे) करावे. अन्यथा गाठ निर्माण होऊ शकते.
Intramuscular(IM2) पद्धत-
ह्या पद्धतीत इंजेक्शन देतांना थोड़ी काळजी घ्यावी लागते. कारण ह्या पद्धतीत इंजेक्शन हे मांस पेशीत दयाव्याचे असते. त्यामुळे जर चुकून इंजेक्शनची सुई शेळीच्या हाडाला लागली तर तिला आंतरिक इजा होऊ शकते. इंजेक्शन हे शेळीच्या मागच्या पायाच्या मांडीत दयावे. कारण तेथील मांसपेशी ह्या जास्त असतात. इंजेक्शन हे जास्त खोलवर देऊ नये. इंजेक्शन आत गेल्यावर इंजेक्शनचे प्लंजर हे हळुवार दाबावे इंजेक्शन हे रक्तवाहिनीमध्ये घुसणार नाही, याची काळजी घ्यावी. इंजेक्शन टोचल्यावर जर इंजेक्शनमध्ये जर रक्त येत असेल तर ते लगेच बाहेर काढावे. परत दुसर्‍या ठिकाणी दयावे. टोचल्यानंतर लगेच ती जागा चोळावी जेणेकरुन औषध पूर्ण पणे पसरले जाईल. सौजन्य :- अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रकाशन


इंजेक्शन देतांना घ्यावयाची काळजी
1) इंजेक्शनची एक्सपायरी डेट चेक करावी.
2) इंजेक्शन हे एकदा वापरले की नष्ट करावे.
3) एकाच सुईने एकाच शेळीला इंजेक्शन दयावे.
4) इंजेक्शन देण्याआधी सर्व सुचना वाचाव्या व त्यांचे पालन करावे.
5) इंजेक्शनची मात्र तपासूनच द्यावी.
6) इंजेक्शन शक्यतो उन पड़ण्याच्या आधी किंवा संध्याकाळी दयावे.
7) इंजेक्शन दिल्यानंतर ती जागा चोळून घ्यावी.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंत्रविषारपायलागफाशीबुळकांडीलसीकरण
Previous Post

कापुस पातेगळ समस्या व उपाय

Next Post

शिरसोली जळगांवचे कॅलिफोर्निया

Next Post
शिरसोली जळगांवचे कॅलिफोर्निया

शिरसोली जळगांवचे कॅलिफोर्निया

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish