मुंबई : शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. तसेच या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट केंद्र सरकारकडून दिले जातात. दरम्यान, या योजनेतील 13 व्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.
पीएम किसान सन्मान निधीबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की, दुसऱ्याच्या जमिनी नांगरून पीएम किसान योजनेचा फायदा घेता येईल का?. तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. शेती ज्याच्या नावावर असेल तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. समजा, जर जमीन ही वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि ही जमीन तुमच्या नावावर नोंदणीकृत नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल/ लाभ घेऊ शकत नाही. तसेच पीएम किसान योजनेसाठी जमिनीची नोंदणी आवश्यक आहे. मात्र, दुसऱ्याची जमीन नांगरत असाल आणि जमीनही तुमच्या नावावर नोंदवली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
अडचण आल्यास या हेल्पलाईन नंबरवर करा कॉल
पीएम किसान योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी या [email protected] ईमेल आयडीवर अडचण नोंदवू शकतात. किंवा या 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री), 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून शकतात.