Home यशोगाथा ब्लूबेरी फार्मिंग : एका एकरात वर्षभरात 60 लाखांची कमाई; जाणून घ्या पाचगणीतील...

ब्लूबेरी फार्मिंग : एका एकरात वर्षभरात 60 लाखांची कमाई; जाणून घ्या पाचगणीतील टिपटॉप शेतकऱ्याची कहाणी

ब्लूबेरी फार्मिंग

ब्लूबेरी फार्मिंग काही आता आपल्याकडे नवीन राहिलेले नाही. एक्झॉटीक फळांमध्ये अमेरिकन ब्लूबेरीला मोठी मागणी असते. देशातील अनेक भागातील शेतकरी आता अमेरिकन ब्लूबेरीची लागवड करत आहेत. मात्र, या शेतीची आपल्या देशात सुरुवात करणारे आहेत अंबरीश प्रतापराय करवट. एक छोटेसे फळ व्यापारी, एजंट … ते आज एका कार्पोरेट फार्मिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/

 

अमेरिकन ब्लूबेरीची सरासरी विक्री किंमत ₹ 1000 प्रति किलो इतकी राहते. वर्षभर मागणी आणि दर टिकून राहतात. त्यामुळे ही अत्यंत फायद्याची शेती आहे. अंबरीश करवट यांनी 1980 मध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे मध्यपूर्वेला ताज्या उत्पादनांची निर्यात करून करिअरची सुरुवात केली. 1989 मध्ये त्यांनी ताजी फळे, भाजीपाला आणि फुलांची स्वतःची शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतात सुरू झालेल्या कॅलिफोर्निया स्ट्रॉबेरी फार्मिंगमध्ये अग्रगण्य असण्यासोबतच, जगभरातून ताज्या फळांच्या आयातीच्या व्यवसायातही अंबरीश करवट हे एक ट्रेलब्लेझर आहेत. सध्या ते युप्पा फ्रेश कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय पार्थ फार्म्सचे मालकही आहेत.

 

 

जर एखाद्या शेतकऱ्याने अमेरिकन ब्लूबेरी शेती सुरू केली तर तो चांगली कमाई करू शकतो. भारतात अमेरिकन ब्लूबेरी ही चांगल्या प्रकारची लागवड आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वरच्या पाचगणीमध्ये अंबरीश यांनी अमेरिकन ब्लूबेरीची लागवड सुरू केली आहे. अमेरिकन ब्लूबेरीच्या लागवडीतून त्यांना लाखोंची कमाई होत आहे. अमेरिकन ब्लूबेरी शेतीच्या टिप्स आता ते इतर शेतकऱ्यांना देतात. मात्र, तत्पूर्वी पाचगणीच्या या टिपटॉप शेतकऱ्याने स्वतः ती शेती यशस्वी करून दाखविली आहे.

 

भारतात पहिली ब्लूबेरी शेती

1989 साली भारतात स्ट्रॉबेरीची शेती सुरू करणाऱ्या अंबरीश करवट यांनी आता अमेरिकन ब्लूबेरी शेतीही यशस्वी करून दाखविली आहे. त्यांचे अनुकरण करत केवळ महाबळेश्वरच्या पाचगणीमध्येच नाही तर राज्यभर, देशभरात आता मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. त्याच युप्पा ग्रुपचे अध्यक्ष अंबरीश करवट यांनी आता ब्लूबेरी शेती सुरू केली आहे. तीन वर्षांपासून ब्लूबेरीची कापणी करणाऱ्या करवट यांनी देशातील इतर शेतकऱ्यांना ब्लूबेरीची लागवड करण्यास प्रोत्साहित केले आहे.

युजिता आणि अंबरीश करवट

ब्लूबेरी फळ मानले जाते सुपरफूड

अमेरिकन ब्लूबेरीचे फळ हे सुपरफूड मानले जाते. हे जगभर खूप लोकप्रिय झाले आहे. आपल्याकडे ब्लूबेरी अमेरिकेतून आयात केल्या जातात. करवट हे गेल्या 10 वर्षांपासून ब्लूबेरीच्या लागवडीचा अभ्यास करत आहेत. त्यांना आढळले, की ब्लूबेरी आपल्याकडे वाढवणे फार कठीण नाही. त्यामुळेच मुख्यतः उत्तर अमेरिकेत घेतले जाणारे ब्लूबेरी भारतातही घेतले जाऊ शकते, असा विश्वास त्यांना होता. करवट यांनी 4 वर्षांपूर्वी भारतात, पाचगणीत ब्लूबेरीची शेती सुरू केली. त्यांच्या पाचगणी येथील साडेतीन एकर शेतीत प्रयोग म्हणून विविध प्रकारची शेती सुरू केली जाते. तिथे हरितगृह बांधून त्यांनी डोंगरावरील शेती सुपीक केली आहे.

 

42 अंश सेल्सिअस तापमानातही होऊ शकते शेती

भारतात 42 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लूबेरीच्या अनेक जातींची लागवड करता येणे शक्य आहे. तीन वर्षांपासून ब्लूबेरीची कापणी करणाऱ्या करवट यांनी देशातील इतर शेतकऱ्यांना ब्लूबेरीची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ब्लूबेरी हे एक सुपर फूड आहे आणि एकदा लागवड केल्यावर या वनस्पतीला 10 वर्षे फळे येतात. वर्षभरातच फळे यायला सुरुवात होते. जसजसे झाडाचे वय वाढते, तसतसे फळाचे आकारमान वाढत जाते. त्यामुळेच पोषणयुक्त ब्लूबेरीची लागवड करून शेतकरी निश्चितच चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

 

 

ब्लूबेरी शेतीसाठी टिप्स

ब्लूबेरीची रोपे एप्रिल-मेमध्ये लावली जातात आणि पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपासून फळे लागतात. ब्लूबेरीची जूनपर्यंत कापणी करू शकता, त्यानंतर पावसाच्या वेळी ब्लूबेरीची छाटणी केली जाते. ब्लूबेरी रोपे लावण्यापूर्वी, शेत चांगले तयार करायला हवे.

 

पार्थ करवट

 

शेतीची मशागत करताना घ्यावयाची काळजी

रोपांच्या दोन ओळीतील अंतर हे कमीत-कमी 4 ते 5 फूट असाव्ह तर दोन रोपांमधील अंतर किमान 2 फूट तरी असावे. ब्लुबेरीच्या चांगल्या उत्पनासाठी जमिनीचा Ph शक्यतोवर 4.5 ते 5.5 इतका असावा. जर तुमच्या भागात जमिनीचा Ph जास्त असेल तर तुम्ही सल्फरचा वापर करून तो कमी करू शकता. ब्लुबेरी लागवड करताना तुम्ही शेण खत व गांडूळ खताचा वापर करून शकता, ज्याने रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होईल. सिंचनासाठी ठिबक वापरणे अतिशय फायदेशीर राहते. मल्चिंग केल्यानेही मोठा फरक पडतो.

 

मधमाश्यांपासून ब्लूबेरीला फायदा

ब्लूबेरीच्या शेतीसोबतच, करवट यांनी मधमाशांच्या पेट्याही बसवल्या आहेत. त्यांचा चार वर्षांचा ब्लूबेरी शेतीचा अनुभव दर्शवितो, की ब्लूबेरी फार्ममध्ये मधमाश्यांची संख्या जितकी जास्त असेल, तितकी फळाची गुणवत्ता चांगली असेल. शिवाय, फळ आकारानेही मोठे असेल. ब्लूबेरी फळांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आणि कीटकनाशकांचा खर्च कमी करण्यासाठी करवट यांनी शेतात कीटक सापळा बसवला आहे.

 

काढणीनंतर रोपांची छाटणी

पावसाळ्यात ब्लूबेरी रोपांची छाटणी केल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत त्यात फांद्या व फुले येण्यास सुरुवात होते. दरवर्षी ब्लूबेरी रोपाची छाटणी केल्याने फुलांची संख्या वाढते आणि फळांचा आकार वाढतो, ज्यामुळे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

 

पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |

 

पहिल्या वर्षापासून 200-300 ग्रॅम फळ

एक ब्लूबेरी वनस्पती पहिल्या वर्षी 200 ते 300 ग्रॅम फळ देऊ शकते. बरेच लोक ब्लूबेरीला फुले आल्यावर त्यातील पहिले फळ काढून टाकतात, जेणेकरून पुढील वर्षापासून ते चांगले फुलते आणि फळे येतात.

 

एका वर्षात 60 लाखांपर्यंत कमाई

एका एकरात 3,000 ब्लूबेरीची रोपे लावली जातात. जर आपण 4 वर्षांच्या लागवडीबद्दल बोललो, तर प्रति झाड 2 किलो पर्यंत ब्लूबेरी फळ घेता येतात. म्हणजे 6,000 किलो बेरीसाठी, तुम्हाला प्रति किलो 1,000 रुपये किंमत मिळू शकते. यानुसार तुम्ही एका वर्षात 60 लाख रुपये कमवू शकता. पाचव्या वर्षापासून ब्लूबेरीच्या एका रोपातून पाच किलो फळे प्रति रोप घेता येतात. म्हणजेच पाचव्या वर्षापासून उत्पन्न अडीच पट वाढून एका एकरात वर्षाला तब्बल दीड कोटी रुपये कमाई करता येऊ शकते.

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

रोप कुठे मिळतात?

बहुदा ब्लुबेरीचे रोप हे परदेशातून मागवले जाते. उत्तर अमेरिका आणि मेक्सिकोतून आपल्याकडे साधारणतः रोपे येतात. ते 800 रुपये प्रति रोप या दराने खरेदी करता येते. सध्या आपल्या देशातही याचे टिशू कल्चर करून नवीन रोप तयार केली जात आहेत. ते कमी किमतीत मिळू शकतात. ब्लुबेरीचे अनेक वाण आहेत, ज्यात बहुतांश थंड हवामानात वाढणारे आहेत. आपल्याकडे मात्र उष्ण वातावरणात, खडकाळ जमिनीत वाढणाऱ्या जातीचे रोप घेणे चांगले.

 

ब्लुबेरीचे आरोग्याला फायदे

1. ब्ल्यूबेरी माणसाचे आयुष्य वाढवण्यात मदत करू शकते.
2. अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त ब्लूबेरीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यात तांबे, बीटा कॅरोटीन, फोलेट, व्हिटामिन-ए, व्हिटामिन-ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतात.
3. ब्लूबेरीमध्ये विशिष्ट फ्लॅव्होनॉइड रेणू असतात, जे डीएनए नुकसान आणि मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या हानीचा वेग कमी करतात.
4. शरीरात गेलेली अनावश्यक साखर स्नायूंच्या पेशींमध्ये रूपांतरित करते, जी उर्जा म्हणून वापरली जाते. चरबी म्हणून शरीरात अतिरिक्त साखर देखील साठत नाही.
5. ब्लूबेरी मेंदूतील स्मरणशक्तीच्या भागास अपघात आणि सूज यातून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते.
6. ब्लूबेरीमुळे शरीरात डीजेनेरेटिव डिसीज होण्याचा धोका कमी होतो, जो मानवाचे आयुष्यमान कमी करण्यास जबाबदार असल्याचे मानले जाते.
7. वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

 

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇