ऐश्वर्या सोनवणे
काळी मिरी एक मसाला पीक असून त्याची लागवड स्वतंत्रपणे करता येते. काळी मिरीची लागवड करण्यासाठी योग्य हवामान असणे आवश्यक आहे. काळी मिरी उष्ण आणि आर्द्र वातावरणात चांगली वाढ होत असते. लागवडीसाठी तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान लागते. काळी मिरीला चांगली निचऱ्याची आणि जैविक घटकांनी समृद्ध, हल्की व निंदा माती योग्य आहे. मातीचा पीएच हा 5.5 ते 6.5 हवा.
उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात, म्हणजे जून व ऑगस्ट या कालावधीत लागवड केली जाते. काळी मिरीची लागवड दोन पद्धतीत होत असते, एक वेल लागवड आणि रोप लागवड. मिरीच्या वेलीला काठावर किंवा गाभ्यात 5 – 6 इंच अंतरावर लावले जाते. जर रोप तयार केले असतील तर, रोपाला 3 – 4 इंच अंतरावर खोल लावले जाते. काळी मिरी ही मोकळ्या वाऱ्यात आणि हलक्या सूर्यमालेत चांगली वाढते.
पाणी व्यवस्थापन
काळी मिरीच्या लागवडीच्या सुरुवातीला नियमितपणे पाणी द्यावे लागते, पण पिकाला ओलाव्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. मात्र, पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी देऊन साचून देणे देखील नुकसानकारक आहे. काळी मिरीच्या पिकाला हंगामानुसार पाणी देणे आवश्यक आहे. मोठ्या वयाच्या वेलींना पावसाळ्यात नैसर्गिकपणे पाणीपुरवठा होतो.

खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी आणि वेलीच्या प्रारंभिक वाढीच्या काळात सेंद्रिय खतांचा वापर अधिक करावा. भूसंवर्धनासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये गोमूत्र, शेणखत, आणि कंपोस्ट उपयुक्त ठरते. गोमुत्राच्या वापराने मातीच्या जैविकतेमध्ये सुधारणा होते. गोमूत्र मातीतील पोषणतत्वांचा समतोल रखण्यास मदत करते. तसेच शेणखत देखील अत्यंत उपयुक्त आहे. शेणखत साधारण 25 ते 30 टन प्रति हेक्टर खते वापरले जाते. यामुळे मातीची रचना सुधारते आणि मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. कंपोस्ट सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून तयार केलेल्या कंपोस्ट मिरीच्या मातीला पोषणतत्वांचा पुरवठा करत असतो. वेलींच्या वाढीच्या दरम्यान 2 ते 3 महिन्याच्या अंतराने सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे मिश्रण वापरणे योग्य ठरते.
काढणी
काळी मिरी साधारण 2 ते 3 वर्षाच्या कालावधीत तयार होत असते. काळी मिरीची काढणी पिकाच्या फुलांपासून केली जाते, जेव्हा फुलांचा रंग हिरव्या पासून तपकिरी होतो, तेव्हा ते परिपूर्ण पिकले असे समजले जाते.
