मुंबई : Berseem grass… अनेक शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून गाय, म्हैस, बकऱ्या यासारख्या दुधाळ जनावरांचे पालन करून व या जनावरांपासून मिळणारे दूध विकून उत्पन्न मिळवीत असतात. मात्र, अनेकदा गुरांची दूध देण्याची क्षमता कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडतो. मात्र, आता शेतकऱ्यांना कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणताही औषधोपचार व खर्च न करता शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढविता येणार आहे. मात्र याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्याला ही संपूर्ण बातमी वाचणे गरजेचे आहे.
पशुवैद्यकांच्या मते, बरसीम गवत (Berseem grass) जनावरांना खाऊ घालणं खूप फायद्याचे आहे. या गवतामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळे हे गवत जनावरांना खाऊ घातल्याने गुरांची पचनक्रियाही चांगली राहते. यासोबतच बरसीम गवताच्या सेवनाने गाय आणि म्हशीची दूध देण्याची क्षमता वाढते. हिरवे गवत खाल्ल्याने प्राणी निरोगी राहते.
जिरका गवत
बारसीम व्यतिरिक्त जिरका गवत देखील दुभत्या गुरांसाठी गुणकारी आहे. जिरका गवताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कमी सिंचन लागते. तसेच ते कमी वेळात तयार होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने त्याच्या लागवडीसाठी उत्तम मानले जातात. जिरका गवतामध्ये जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळत असल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते.
नेपियर गवत
नेपियर गवत हे उसासारखे दिसते. जनावरांच्या आहारासाठी ते अतिशय पौष्टिक मानले गेले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पीक अवघ्या ५० दिवसांत तयार होते. गुरे ते खातानाच जास्त दूध देऊ लागतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇