पुणे : केळीची सार्वधिक लागवड ही जळगाव जिल्ह्यात केली जाते. केळीला कोणत्या बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला सर्वाधिक दर मिळाला. येथे केळीला जास्तीत जास्त दर हा 5 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 3,250 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
दरम्यान, जळगाव कृषी बाजार समितीत केळीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. येथे केळीला जास्तीत जास्त दर हा 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून आवकेत देखील घट झाली आहे. जळगाव बाजार समितीत केळीची आवक 10 क्विंटल इतकीच झाली आहे. तसेच यावल कृषी बाजार समितीत केळीला चांगला भाव मिळाला असून येथे केळीला जास्तीत जास्त दर 2,075 रुपये दर मिळाला. सविस्तर केळी बाजारभाव खालीलप्रमाणे.
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी (5/1/2024) |
|||
नाशिक | क्विंटल | 360 | 1425 |
जळगाव | क्विंटल | 10 | 500 |
नागपूर | क्विंटल | 44 | 525 |
पुणे | क्विंटल | 9 | 1100 |
पुणे-मोशी | क्विंटल | 32 | 3250 |
यावल | क्विंटल | 2550 | 1975 |
केळी (4/1/2024) | |||
नाशिक | क्विंटल | 230 | 1425 |
पुणे | क्विंटल | 26 | 1100 |
पुणे-मोशी | क्विंटल | 102 | 3250 |
यावल | क्विंटल | 1670 | 1975 |