जळगाव : येथील हॉटेल फोर सिझनच्या सभागृहात ‘नमो बायोप्लान्टस’ कंपनीच्या संपूर्ण खान्देश विभागातील वितरक बांधवांची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली.
या सभेसाठी ‘नमो बायोप्लान्टस’चे मॅनेजिंग डायरेक्टर (एम.डी.) पार्श्व साबद्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी कंपनीच्या अकाउंट विभागाचे प्रमुख निलेश लोढा, रोप वितरण विभागाचे प्रमुख जनार्दन दळवी, ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या वार्षिक वितरक सभेला खान्देश विभागातून 55 ते 60 वितरक बांधवांची उपस्थिती होती. यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पार्श्व साबद्रा यांनी कंपनी विषयी व आतापर्यंत झालेल्या कंपनीच्या प्रवासाविषयी सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे निलेश लोढा व जनार्दन दळवी यांनी कंपनीच्या नवीन धोरणांविषयी जसे पॉलिसी, रोपांची बुकिंग, रोपांचे वितरण, अकाउंट याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापनेबद्दल तसेच सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी कसे काम करता येईल, यासंदर्भात वितरक बांधवाना मार्गदर्शन केले.
कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट मनोहर पाटील यांनी कंपनीच्या टिश्युकल्चर केळी रोप, गुणवत्ता, रोपांची नाविन्यता, नवीन ट्रे आणि केळी लागवडीविषयी सखोल मार्गर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल पाठक यांनी व्यक्त केले.