अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस प्रतिष्ठेचे मानले जाणारे NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन मिळवणारी राज्य शासनाने अधिसूचित केलेली सार्वजनिक उपक्रमामधील पहिली बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे व ही बाब राज्यासाठी विशेषतः महाबीजसाठी फार मोठी उपलब्धी असून गौरवास्पद आहे.
राज्य शासनाने महाबीजच्या अकोला, परभणी आणि जालना येथील तीनही बीज प्रयोगशाळा बियाणे कायदा, १९६६ अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. या प्रयोगशाळांमध्ये कुशल तांत्रिक मनुष्यबळ, अत्याधुनिक सुविधा व उपकरणे उपलब्ध आहे. तसेच चाचणी प्रक्रिया भारतीय किमान बीज प्रमाणीकरण मानकांचे काटेकोर पालन करून राबवली जाते.
- अकोला येथील NABL मानांकीत प्रयोगशाळा पुढील अत्याधुनिक चाचण्यांसाठी सक्षम आहे:
आर्द्रता चाचणी
भौतिक शुद्धता तपासणी
उगवण क्षमता चाचणी
एलिझा चाचणी
बीज आरोग्य तपासणी
डीएनए फिंगरप्रिंटिंग
या NABL मानांकनामुळे महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेची आंतरराष्ट्रीय दर्जाची विश्वासार्हता वाढली असून, निर्यातक्षम बियाण्यांसाठी आवश्यक असलेले अधिकृत चाचणी अहवाल देण्यास ती आता सक्षम झाली आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेला प्राप्त झालेले NABL मानांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या मानांकनामुळे महाबीजची गुणवत्ता नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम झाली आहे.
– श्री. योगेश कुंभेजकर
व्यवस्थापकीय संचालक, महाबीज
महाबीजच्या अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त झाल्यामुळे आता ही प्रयोगशाळा निर्यातक्षम चाचणी अहवाल देण्यास अधिकृत व सक्षम झाली आहे.
– डॉ. प्रफुल्ल लहाने
महाव्यवस्थापक (गु. नि. व संशोधन)
NABL या मानांकनामुळे महाबीजची विश्वासहर्ता वाढली असून ही अभिमानास्पद बाब आहे. या यशामागे आमच्या कर्मचाऱ्यांची मेहनत, भागधारक शेतकऱ्यांचा विश्वास आणि संपूर्ण कर्मचारी वृंदाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ऋणनिर्देश करतो.
– आर. आर. पाटील
बीज परीक्षण अधिकारी, महाबीज
महाबीजच्या प्रयोगशाळेस NABL मानांकन मिळाल्याच्या आनंद समस्त शेतकरी बांधवांना झाला आहे. यामुळे उच्च गुणवत्तेचे बियाणे उत्पादनास प्रोत्साहन मिळेल.
– प्रकाशभाऊ काकड
भागधारक / बिजोत्पादक, अकोला
संपर्क :-
आर. आर. पाटील
बीज परीक्षण अधिकारी, महाबीज
मो. 7588609006