पहिल्याच दिवशी प्रदर्शनास भेट देणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना निर्मल सीड्स व ओम गायत्री नर्सरीतर्फे सॅम्पल भाजीपाला व कांदा सॅम्पल बियाणे मोफत.. तसेच देवगड हापूस मँगो पल्प, अस्सल इंद्रायणी तांदूळ व द्राक्ष महोत्सवासह चर्चासत्रांचीही मेजवानी..
शहादा : कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्य करणाऱ्या अॅग्रोवर्ल्डतर्फे 10 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहाद्यातील प्रेस मारुती मैदानावर आयोजित या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत..
प्रदर्शनात काय पहाणार..??
मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारे, सोलर फार्मिंग / सोलर पंप, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली…