मुंबई : Agricultural Universities… महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे नापास ठरली आहेत. दर्जा, गुणवत्तेच्या राष्ट्रीय क्रमवारीत राज्यातील फक्त 1 संस्था स्थान मिळवू शकली आहे. विस्तार कार्यक्रमांकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांशी तुटलेली नाळ, संशोधनाचा अभाव, कालानुरूप अभ्यासक्रम वा शिक्षण पद्धतीत न केले गेलेले बदल, विद्यार्थ्यांत कृषी उद्योजकीय मानसिकता रुजविण्यात आलेले अपयश यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठे पांढरा हत्ती ठरू लागली आहेत. तशा या यादीत राज्यातील 2 संस्था दिसत असल्या तरी त्यातील एक संस्था केंद्राची आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची राष्ट्रीय क्रमवारी गेल्या आठ वर्षांपासून जाहीर केली जाते. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (NIRF – National Institutional Ranking Framework) ही उच्च शिक्षण संस्थांनी स्वतः केलेल्या ‘मूल्यमापना’वर आधारीत असते. या यादीच्या विश्वासार्हतेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी संस्थांच्या दर्जा वाढीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी गेली काही वर्षे NIRF यादी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/
देशात आयआयटी, आयआयएम, आयआयएससी, बिट्स-पिलानी अशा काही संस्थांनी सातत्याने आपला दर्जा आणि नावीन्य टिकवून ठेवले आहे. यंदा शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता क्रमवारी यादीत पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील विद्यापीठांची घसरण झालेली दिसते. कृषी शिक्षण देणाऱ्या राज्यातील विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे.
NIRF कृषी शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान (संशोधन) संस्था म्हणजेच Indian Agricultural Research Institute अव्वल स्थानी आहे. करनाल, हरियाणा येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था (ICAR-NDRI) यादीत दुसऱ्या स्थानी आहे. लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ (PAU) तिसऱ्या स्थानी आहे.
एनआयआरएफ यादीत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर वाराणसी, कोइंबतूर आणि बरेली येथील संस्था आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाचे (BHU) कृषी शिक्षण देशात चौथे सर्वोत्कृष्ट ठरले. कोइंबतूरचे तामिळनाडू कृषी विद्यापीठ (TAU) पाचव्या तर उत्तर प्रदेशातील इज्जतनगर (बरेली) येथील भारतीय पशू संशोधन संस्था (IVRI) सहाव्या स्थानी आहे.
केंद्र सरकारचे वर्सोवा, मुंबईतील मत्स विद्यापीठ म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज विद्यापीठ हे NIRF यादीत सातव्या स्थानी आहे. त्यानंतर राज्यातील पहिल्या 40 संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव कृषी विद्यापीठ 36 व्या स्थानी आहे. मुंबईतील फिशरीज युनिव्हर्सिटी ही केंद्र सरकारची आहे. म्हणजेच उत्तम कृषी शिक्षण देणाऱ्या 40 संस्थांच्या NIRF यादीत महाराष्ट्रातील एकमेव कृषी विद्यापीठाला स्थान मिळविता आले आहे, तेही शेवटून पाचवे.
देशातील सर्वोत्तम कृषी संस्थांची NIRF यादी अशी
1. भारतीय कृषी संशोधन संस्था (नवी दिल्ली)
2. ICAR – राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था (कर्नाल, हरियाणा)
3. पंजाब कृषी विद्यापीठ (लुधियाना)
4. बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी, उत्तर प्रदेश)
5. तामिळनाडू कृषी विद्यापीठ (कोईम्बतूर)
6. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली, उत्तर प्रदेश
7. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी (मुंबई)
8. जीबी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (पंतनगर, उत्तराखंड)
9. शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (श्रीनगर, जम्मू-काश्मीर)
10. चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ (हिसार)
11. कृषी विज्ञान विद्यापीठ (बंगलोर, कर्नाटक)
12. तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ (चेन्नई, तामिळनाडू)
13. राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, उद्योजकता आणि व्यवस्थापन (तंजावर, तामिळनाडू)
14. चौधरी सर्वन कुमार हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठ (कांगडा, हिमाचल प्रदेश)
15. केरळ कृषी विद्यापीठ (त्रिचूर, केरळ)
16. बिधान चंद्र कृषी विद्यापीठ (नादिया, पश्चिम बंगाल)
17. डॉ. वाय.एस. परमार विद्यापीठ ऑफ हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्री (सोलन, हिमाचल प्रदेश)
18. आनंद कृषी विद्यापीठ (आनंद, गुजरात)
19. आसाम कृषी विद्यापीठ (जोरहाट, आसाम)
20. आचार्य एनजी रंगा कृषी विद्यापीठ (गुंटूर, आंध्र प्रदेश)
21. गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ (लुधियाना, पंजाब)
22. ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (भुवनेश्वर, ओडिशा)
23. अन्नामलाई विद्यापीठ (अन्नामलाईनगर, तामिळनाडू)
24. राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (सोनीपत, हरियाणा)
25. केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (कोची, केरळ)
26. पश्चिम बंगाल पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (कोलकाता)
27. लवली व्यावसायिक विद्यापीठ (फगवाडा, पंजाब)
28. कृषी विज्ञान विद्यापीठ (धारवाड, कर्नाटक)
29. केंद्रीय कृषी विद्यापीठ (इंफाळ, मणिपूर)
30. चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (कानपूर, उत्तर प्रदेश)
31. श्री व्यंकटेश्वर पशुवैद्यकीय विद्यापीठ (तिरुपती, आंध्र प्रदेश)
32. राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (हैदराबाद, तेलंगणा)
33. डॉ राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ (समस्तीपूर, बिहार)
34. लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ (हिसार, हरियाणा)
35. आचार्य नरेंद्र देवा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (कुमारगंज, अयोध्या; फैजाबाद, उत्तर प्रदेश)
36. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी, महाराष्ट्र
37. कर्नाटक पशुवैद्यकीय, पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नंदीनगर, बिदर, कर्नाटक)
38. जुनागढ कृषी विद्यापीठ (जुनागड, गुजरात)
39. कृषी विज्ञान विद्यापीठ (रायचूर, कर्नाटक)
40. डॉ.जे. जयललिता फिशरीज युनिव्हर्सिटी (नागपट्टणम, तामिळनाडू)