लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता 10 किलो प्रतिएकर या प्रमाणात 30 दिवसांनी, तर दुसरा हप्ता याच प्रमाणात 45 दिवसांनी द्यावा.
लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांनी खुरपणी करावी.
लागवडीनंतर 30, 45 आणि 60 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण (ग्रेड-II) 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
फुलकिडे आणि करपा नियंत्रण
पहिली फवारणी – कार्बोसल्फान 2 मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल 1 ग्रॅम
दुसरी फवारणी – पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर, प्रोफेनोफॉस (50 ईसी) 1 मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (5 ईसी) 1 मि.लि.
तिसरी फवारणी – दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर, फिप्रोनील (5 एससी) 1 मि.लि. अधिक प्रोपीकोनॅझोल (25 ईसी) 1 मि.लि.
पांढऱ्या लांबट कोळींचा प्रादुर्भाव आढळल्यास, सल्फर (80 डब्ल्यूजी) 2 ग्रॅम किंवा डायकोफॉल (18.5 ईसी) 2 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
पिकाच्या गरजेनुसार लागवडीनंतर 110 ते 115 दिवसांपर्यंत पाण्याच्या पाळया द्याव्या.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)