Home बाजार भाव कांदा निर्यातबंदी उठविल्यानंतर कांद्याला काय मिळतोय दर ?

कांदा निर्यातबंदी उठविल्यानंतर कांद्याला काय मिळतोय दर ?

पुणे : केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रण आणण्यासाठी आठ डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदी केली होती. आणि हा निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले होते मात्र त्याआधीच काल झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवण्यात आली आहे.

दरम्यान, कांद्यावरी निर्यातबंदी उठविली आहे. पण, शेतकऱ्यांना तीन लाख मेट्रिक टन इतकाच कांदा निर्यात करता येणार आहे. निर्यातबंदी उठविल्यानंतर कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

 

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. येथे कांद्याची 16,725 क्विंटल आवक झाली असून कांद्याला जास्तीत जास्त 1,600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2,200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच इतरही बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे…

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (18/2/2024)

खेड-चाकण क्विंटल 500 1100
मंचर क्विंटल 8300 1625
सातारा क्विंटल 334 1300
राहता क्विंटल 384 1100
जुन्नर क्विंटल 258 1300
अकलुज क्विंटल 370 1000
पारनेर क्विंटल 15557 1400
वैजापूर क्विंटल 7027 1600
पुणे क्विंटल 16725 1050
पुणे- खडकी क्विंटल 5 1200
पुणे-मांजरी क्विंटल 48 1800
पुणे-मोशी क्विंटल 473 850
मंगळवेढा क्विंटल 37 1000
जुन्नर -ओतूर क्विंटल 7221 1400

 

 

Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇