मुंबई : काम कोणतेही असो त्यात सातत्य आणि चिकाटी असेल तर नक्कीच आपण त्यात यश मिळवू शकतो. अगदी शेतीचे क्षेत्र जरी असलं तरी त्यात आपण यश मिळवू शकतात. शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. असेच एका महिलेने धाडस करून कृषी क्षेत्रात पहिली महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळविला आहे.
कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ड्रोन फवारणी यंत्राच्या माध्यमातून औषध फवारणी सोपी झाली आहे. बोरगाव मेघे येथील लीनता वाघमारे यांची वर्ध्यातील एका खाजगी कंपनीत निवड करण्यात आली आहे. खाजगी कंपनीकडून दोन ड्रोन पायलटची नियुक्ती करण्यात आली होती. यात लीनता वाघमारे यांची निवड झाली.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
लीनता शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे सांगतात फायदे
लीनता वाघमारे यांचे शिक्षण हे बीएससी कृषी आणि एमएससी बॉटनीपर्यंत झाले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह साडेतीन वर्षाचा मुलगा सांभाळताना लीनता यांना नवीन काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द शांत बसू देत नव्हती. अशातच लीनता यांना पुण्यातील एका खाजगी कंपनीची जाहिरात हाती लागली. त्यांनी याठिकाणी मुलाखत दिली असून आता ड्रोन पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. आपले प्रशिक्षण संपवून कामाला लागलेल्या लीनता शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे फायदे पटवून सांगतात.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील झडशी येथे वडील प्रभाकर शेळके शेती व्यवसाय करत असून पती प्रीतम वाघमारे पतसंस्थेत नोकरीस आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये शेतकरी कुटुंबातील मुलगी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- कुसुम योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेसाठीचे मॅसेज सुरु
- सिक्कीम “जगातील पहिले सेंद्रिय राज्य”, राज्यात 100% सेंद्रिय धोरण लागू