• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक, हॅपनिंग
0
सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

फक्त बांधावर लागवड केले जाणारे फळझाडे कधी शेतात उत्पादनासाठी घेतली जाऊ लागली हे कळलेच नाही. त्यात काही नाशवंत तर काही दीर्घकाळ टिकणारी आहेत. परंतु महाराष्ट्रात जय शेतकऱ्यांच्या क्षेत्रात पाणी उपलब्ध नाही अश्या शेतकऱ्यांना सीताफळ हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. कोरडवाहू फळपिकातील महत्त्वाचे पिक म्हणजे सीताफळ. फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. सीताफळ हे एक नाशवंत वर्गातील फळ आहे. जास्त नाशवंत फळ असल्यामुळे ते जास्त दिवस साठवता येत नाही. सीताफळाच्या हंगामात फळाची आवक मोठया प्रमाणावर झाल्यानंतर फळांचे भाव कोसळतात व शेतकऱ्यांचे नुकसान होते, सीताफळ हे पक्व झाल्यानंतर जास्त दिवस साठवुन ठेऊ शकत नाही त्यामुळे त्यावर प्रक्रिया करुन त्याचा गर वेगळा करुन त्याची साठवुन करुन त्याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी करता येतो. त्यामुळे वर्षभर सीताफळाचा आस्वाद घेता येऊ शकतो. या प्रक्रीयेमध्ये सीताफळ गर, गराची पावडर टॉफी जॅम  सरबत सीताफळ टॉफी श्रीखंड मिल्कशेक रबडी सीताफळ आईस्क्रिम सीताफळ पेये (आरटीएस) असे पदार्थ तयार करणे हि एक नवीन व्यवसाय संधी उपलब्ध झाली आहे.

 सीताफळ गर

प्रथम पिकलेली निरोगी चांगली सिताफळे निवडुन घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांचे दोन भाग करावेत. बियांसहीत गर अलगदपणे चमच्याने काढुन घ्यावा. हा काढलेला गर मिक्सरला लावुन 1 मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये 500 पीपीएम सायट्रीक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळुन गरम करावा. हा गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टिबल पाऊचेसमध्ये भरुन हवाबंद करावा. पाश्चराईज करुन थंड करुन लेबल लावुन थंड ठिकाणी (शितगृहात -180० से.ग्रे. तापमानात साठवुन ठेवावा). सीताफळाच्या गरापासुन पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्क शेक, रबडी, आईस्क्रिम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात.

गराची पावडर

फळांचा काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम सायट्रीक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड व 2-3 टक्के माल्टोडेक्स्ट्रीन मिसळुन स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम डायरमध्ये 5-8 टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा. यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरुन थंड ठिकाणी साठवुन ठेवावी. अशा प्रकारे तयार झालेली पावडर आईस्क्रिम, कन्फेक्शनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इ. पदार्थ तयार करतांनी वापरता येते. औद्योगिकस्तरावर गराची पावडर हा महत्वपुर्ण घटक म्हणुन वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी उपयोग होतो. तसेच त्यात पाण्याचा अंश कमी असल्यामुळे ते जास्त काळ टिकून राहते.

 जॅम

गराच्या वजनाएवढी साखर मिसळुन तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर 2-5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळुन ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचा टिएसएस 68-69 टक्के असतो. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन बाटल्या थंड करुन, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा एल्युमिनियम फॉईल लावुन, हवाबंद करुन झाकण लावावे. बाटल्या थंड जागी साठवाव्यात.

 सरबत

गर 15 टक्के साखर, 15 टक्के सायट्रीक आम्ल, 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजुन घेतली साखर, सायट्रीक आम्ल व पाणी मिसळुन ते चांगले ढवळुन घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातुन गाळावे. जर हे सरबत जास्त काळ साठवुन ठेवायचे असल्यास ते गरम करुन त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळुन निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली. च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन, झाकण लावावे (1-2 महिने).


 सीताफळ 

सिताफळाचा 1 किलो गर घेऊन त्यात 2 किलो साखर व 1 किलो द्रव ग्लुकोज टाकावी. हे मिश्रण साधारण 95 टक्के साखरेचे प्रमाण येईपर्यंत किंवा गोळी तयार होईपर्यंत उकळावे. थंड होत असतांनाच साच्यात टाकुन वड्या पाडाव्यात, तयार झालेली टॉफी थंड झाल्यावर सिलोफेनच्या वेष्टणात टाकावी.

 श्रीखंड 

सिताफळाचा गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळुन मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रुटस टाकुन फ्रिजमध्ये ठेवुन थंड करावे.

 मिल्कशेक

गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दुध गाळुन घेऊन गरम करुन ते प्रमाणित करावे. नंतर ते 70० से. तापमानास 15 मिनिटे गरम करावे. त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम ऐल्जिनेट मिसळुन 10 टक्के साखर आणि 10 टक्के गर किंवा पावडर मिसळुन हे मिश्रण चांगले गाळुन घ्यावे. त्यानंतर 70० सेल्सिअस तापमानास 30 मिनिटे गरम करावे. नंतर ते 100० सेल्सिअस तापमानास तीन तास थंड करुन घ्यावे. परत ते 20० अंश सेल्सिअस ते 40० अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करुन मिक्सरला घुसळवुन घ्यावे.

 रबडी

1 लिटर दुध एका नॉनस्टिक पॅनमध्ये घ्या व दुध अर्धे झाले की 2 चमचे साखर टाका. साखर विरघळली की, चिमुटभर सोडा टाका व हलवुन घ्या. शेवटी 1 कप सीताफळ पल्प टाकुन मिसळुन घ्या. 1 मिनिट गॅस बंद करा. थंड होऊ द्या. तयार झालेल्या मिश्रण फ्रिजमध्ये 1 तास ठेवावे. साखरेचे प्रमाण कमीच असावे कारण साखर जास्त टाकली की सीताफळाची चव निघुन जाते.

 सीताफळ आईस्क्रिम

दुध, साखर, दुध पावडर एकत्र करा. व गॅसवर ठेवुन सतत 5 मिनिटे हलवत रहा. थंड झाले की फ्रिजमध्ये 10 तास ठेवा. 10 तासाने विप करुन घ्या नंतर अर्धा सीताफळाचा पल्प टाका व 10 मिनिटे विप करा. नंतर अर्धा सीताफळाचा पल्प टाका व मिक्स करा. हवा बंद डब्यात ठेवा. डब्बा 12 तास फ्रिजरमध्ये ठेवा.

 सीताफळ पेये (आरटीएस)

आरटीएसमध्ये 10 टक्के रस, 10 टक्के टीएसएस आणि आम्लतेचे प्रमाण 0.3 टक्के असते. एक लिटर गाळुन घेतलेल्या रसामध्ये पाणी 1.2 कि. साखर आणि 20 ग्रॅम सायट्रीक आम्ल मिसळावे. मिश्रण विरघळेपर्यंत हलवत रहावे. चांगले ढवळुन तयार आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरुन सीलबंद करावे.

लेखक:
प्रा. डॉ. अरविंद सावते, श्री. शैलेंद्र कटके
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Share this:

  • Facebook
  • X
Tags: सीताफळ पेये (आरटीएस)सीताफळ प्रक्रिया
Previous Post

लष्करी अळीचा धोका टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन गरजेचे

Next Post

शेतकऱ्यांनाच करावा लागणार पिकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा!

Next Post
शेतकऱ्यांनाच करावा लागणार पिकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा!

शेतकऱ्यांनाच करावा लागणार पिकविमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा!

ताज्या बातम्या

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.