33 वर्षांच्या तरुणाने 3 वर्षे शेती करून 1,200 कोटींची कंपनी उभी केली, यावर विश्वास नाही ना बसत. तर मग आपण जाणून घेऊ “झेटा फार्म्स” या “ॲग्री स्टार्टअप”ची कहाणी. कठोर परिश्रम, जिद्द आणि स्मार्ट शेती पद्धतीचा अवलंब करून राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणार्या ऋतुराज शर्माने अवघ्या 3 वर्षात करोडोंची कंपनी उभी केली आहे. Zetta Farms Agri Start Up
पैसा काही झाडांवर उगवत नाही, अशी एक म्हण आपल्याकडे आहे, पण ऋतुराज यांनी ही म्हण प्रत्यक्षात खरी करून दाखवली आहे. पैसाही झाडांवरच लागतो, हे त्यांनी दाखवून दिले. अवघ्या 33 वर्षांच्या ऋतुराज यांनी यशस्वी व्यावसायिक शेतीचा उद्योग कसा उभारू शकतो, त्याचा आदर्श उभा केला आहे.
कार्पोरेट करार शेतीत “झेटाफार्म्स”ने केली कमाल
गुडगावस्थित कंपनी Zettafarms ही एक यशस्वी कृषी स्टार्टअप कंपनी आहे, जी कॉर्पोरेट शेती करत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक आहेत ऋतुराज शर्मा. B.Tech आणि MBA केल्यानंतर ऋतुराज यांनी नोकरीऐवजी Startups ने सुरुवात केली आणि Zettafarms हा त्यांचा तिसरा स्टार्टअप आहे. या कंपनीने कृषी क्षेत्रात यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. झेटाफार्म्स कोणते काम करते आणि शेती करून करोडो नफा कसा कमवत आहे, ते आपण जाणून घेऊ.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
15 राज्यांमध्ये कंपनीचा विस्तार
झेटाफार्म्स कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. एका शेतकऱ्याकडून किमान 50 एकर, तर एका गटाकडून किमान 100 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली जाते. त्यानंतर त्या जमिनीवर कंपनी स्वतःच्या पद्धतीने शेती करते. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून त्यामध्ये सुमारे 60 पिके घेतली जातात. गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची पिके या शेतीत घेतली जात आहेत.
शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?
ऋतुराज शर्मा सांगतात की, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराज यांनी शेतीकडे पाऊल टाकले. सुरुवातीला फक्त 2 एकर शेती कसण्यास सुरूवात केली आणि हळूहळू भाडेतत्त्वावर, करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराज यांच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला; पण नंतर झपाट्याने काम वाढले. आज ते 20 हजार एकरात शेती करत आहेत. ऋतुराज त्यांची दुसरी कंपनी ग्रोपिटलकडून शेती करण्यासाठी भांडवल घेतात.
झेटाफार्म्स मॉडेल काय आहे?
कंपनीचे संस्थापक ऋतुराज म्हणतात, की एका ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते, परंतु संपूर्ण देशाची शेती एकाच वेळी अपयशी होऊ शकत नाही. या विचारसरणीनुसार, झेट्टाफार्म्स पीक विविधतेवर काम करत आहे. वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती केली जात आहे. झेटाफार्म्स कंपनी केंद्रीकृत व्यवस्थापनासह म्हणजे सेंट्रलाईज्ड मॅनेजमेंटने काम करते, ज्यामुळे शेतीचे काम सर्वत्र अतिशय कार्यक्षमतेने केले जाते. Zettafarms टीममध्ये ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्समधील सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे.
शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर
झेटाफार्म्सकडून शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामध्ये माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा केली जाते. हवामान ॲप्स आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारचे डेटा विश्लेषण वापरतात. गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथे तेच काम केले जाते. याशिवाय, कुठे पाणी कमी असल्यास तिथे कमी पाण्यातील पिके घेण्याच्या नियोजनावर काम केले जाते. संसाधनांचा योग्य वापर करतात, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो.
पीक विविधीकरणाव्यतिरिक्त जोखीम व्यवस्थापन देखील करतात. औषधे, खते किंवा कीटकनाशके वापरताना कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. झेटाफार्म्स शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी काम करत आहे.
झेटाफार्म्सची भविष्यातील योजना
ऋतुराज शर्मा सांगतात, की ते शेतीला एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत, की शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात सध्या ऋतुराज व्यस्त आहेत.
Zettafarms बद्दल अधिक माहितीसाठी, https://www.zettafarms.com/ येथे भेट द्या. याशिवाय, Growpital बद्दल https://www.growpital.com/ वरून अधिक माहिती मिळवू शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- नैसर्गिक नदी नसलेल्या जगातील 2 सर्वात कोरड्या देशातील शेतीची कथा
- केळी निर्यातीतून वर्षाला 35 लाखांची कमाई