वेलिंग्टन : गाई-मेंढ्यांनी भरपेट खाऊ नंतर ढेकर दिल्यास मालकाला भरावा लागेल दंड! आहे की नाही अनोखा नियम. हा अजब-गजब नियम लागू होणार आहे तो न्यूझीलंडमध्ये. इथल्या सरकारने पाळीव जनावरांच्या ढेकरावर (बुर्प्स) दंड (कर) लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
अशा प्रकारचा कर लावणारा न्युझीलंड हा जगातील पहिला देश आहे. इथे गायींसह इतर गुरांनी ढेकर दिल्यास मालक शेतकर्यांकडून दंड वसूल केला जाईल. ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेल्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पर्यावरण वाचवण्यासाठी निर्णय
कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडने पर्यावरण वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. 50 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने मिथेनसह हरितगृह वायूंचे उत्सर्जन थांबवण्यासाठी अनेक उपाय योजण्यात सुरुवात केली आहे. त्याचाच हा एक भाग आहे. 2025 पासून हा दंड प्रस्तावित आहे.
गुरांकडून घातक मिथेनचे उत्सर्जन
न्यूझीलंडमध्ये एक कोटींहून अधिक गुरे आहेत, त्यापैकी बहुतेक मेंढ्या आणि गायी आहेत. येथे उत्सर्जित होणाऱ्या एकूण हरितगृह वायूंपैकी निम्मे वायू शेतीतून येतात. यामध्ये मुख्य म्हणजे मिथेन वायू. सरकार आणि शेतकरी समुदायाच्या प्रतिनिधींनी तयार केलेल्या मसुद्यानुसार, ‘शेतकऱ्यांना 2025 पासून त्यांच्या गुरांच्या वायू उत्सर्जनासाठी पैसे द्यावे लागतील. काही वायू असे असतात की ते वातावरणात दीर्घकाळ राहतात तर काही थोड्या काळासाठी राहतात. अशा प्रकारे, वायूंच्या उत्सर्जनाच्या कालावधीनुसार कर आकारला जाईल. त्याचबरोबर कोणता प्राणी एका दिवसात किती मिथेन उत्सर्जित करतो, हे विशिष्ट पद्धतीने मोजले जाईल.
‘सरकारकडून नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रक्कम देखील दिली जाणार आहे. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास न्यूझीलंडचे हवामान खात्याचे मंत्री जेम्स शॉ यांनी म्हटले आहे.
Transpar cow’s in India ok