मुंबई – नैऋत्य मोसमी पावसाने मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांवर आगेकूच केल्याने, गोव्यासह कोकण पट्ट्यातील काही भागांमध्ये मान्सून येत्या एक ते दोन दिवसांत पोहोचेल अशी अनुकूल परिस्थिती आहे.
“मान्सून सुरू होत असताना तो जोरदार अवस्थेत नाही. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत कोकणातील काही भागांत प्रगती झाली असली तरीही कोणत्याही जोरदार किंवा तीव्र पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) सूत्रांनी सांगितले. गोवा व कोकणात दाखल होताना पहिल्या 24 तासांत 2- 6 cm मध्यम पावसाचा अंदाजही IMD ने वर्तविला आहे.
मान्सूनच्या दोन्ही शाखांची अनुकूल वाटचाल..
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा काही भाग, संपूर्ण केरळ, तामिळनाडूचा आणखी काही भाग व्यापला आहे. मान्सूनची दुसरी शाखा आग्नेय बंगालचा उपसागर, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, पूर्वेकडील बहुतांश भागांवर पुढे सरकला आहे. मध्य बंगालचा उपसागर आणि पश्चिम मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग या दुसऱ्या शाखेने व्यापला आहे.
103% पावसाचा अंदाज..
IMD ने असाही अंदाज वर्तवला आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील हंगामी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 103% असण्याची शक्यता आहे, मॉडेल त्रुटी अधिक किंवा उणे 4% आहे. 1971-2020 च्या डेटावर आधारित संपूर्ण देशभरातील हंगामी पावसाचा LPA 87 सेमी आहे.
बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली..
मान्सून १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला. मात्र, त्यानंतर तो काही काळ तिथेच रेगाळला. अखेर २९ मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली आला असला तरी आद्रता वाढल्याने उकाड्यात मात्र वाढ झाली आहे.
Nice information