व्यवस्थितरीत्या व्यवस्थापन केले, तर उन्हाळ्यातही ब्रॉयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 🥭
खालील व्हिडिओ पहा..
उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज..
हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या आत्मसात केले तर आपल्या ब्रॉयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते.
ब्रॉयलरसाठी 65.75 अंश फॅरानाइट हे योग्य तापमान आहे. पण, यापेक्षा कमी किंवा जास्त हवामानातील तापमान ब्रॉयलरच्या शरीरावर परिणाम करते व कोंबड्या या वातावरणात राहू शकत नाही.
उन्हाळ्यात ब्रॉयलरच्या शरीरावर होणारे परिणाम..
ब्रॉयलरच्या शरीरावर उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. यामध्ये शरीरातून उष्णता मुक्त होण्याचे प्रमाण व शरीरात उष्णता निर्माण करण्याचे प्रमाण या प्रमाणात बदल झाल्यास परिणाम आढळतो.
* पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
* खाल्लेल्या खाद्यांचे शरीरात वजन वाढीसाठी उपयोग न होता ते वाया जाते व वाढीवर परिणाम होतो.
* शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. (हृदयाची स्पंदने वाढतात व वाढ खुंटते.)
* रोग प्रतिकार क्षमता कमी होते व पक्षी दगावण्याची शक्यता वाढते.
*विविध तापमानाचा ब्रॉयलर पक्ष्यांवर होणारा परिणाम..*
* 65 ते 80 अंश फॅरानाइट योग्य तापमान ज्यामध्ये कोंबड्या आनंदी व उत्साही राहतात. वाढ चांगल्याप्रकारे होते.
* 81 ते 85 अंश फॅरानाइट खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते व शरीरामध्ये खाद्याचे वजनात रूपांतर खूपच कमी प्रमाणात होते.
* 86 ते 95 अंश फॅरानाइट तापमान जसजसे 86 अंश फॅरानाइटच्या वर जाते. तसतसे कोंबड्या खाद्य खाने 2-3 टक्के कमी करतात.
* 96 ते 100 अंश फॅरानाइट या तापमानात कोंबड्या आपले पंख पसरतात. खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकतात व यामुळे उष्माघात होतो व कोंबड्या दगावतात.
* 101 अंश फॅरानाइट ते त्यापेक्षा जास्त या तापमानाला कोंबड्या दगावतात.
तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलरचा प्रतिसाद..
* माणसाप्रमाणे घामग्रंथी नसल्यामुळे ब्रॉयलर जवळ खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हा एकमेव मार्ग असतो.
* खूप जास्त प्रमाणात वातावरणातील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ब्रॉयलर कोंबड्या त्यांच्या हालचाली थांबवतात.
* कोंबड्या भुश्यामध्ये विष्टा टाकतात जी त्याच्या शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते.
* अयोग्य तापमानात (80 अंश फॅरानाइट) ब्रॉयलर त्यांची पंख व चोच उघडतात, याद्वारे ते जास्त प्रमाणात उष्ण व दमट हवा बाहेर टाकतात.
उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना
पोल्ट्री फार्मचे नियोजन
* पोल्ट्रीची बांधकामाची दिशा उत्तर-दक्षिण असावी. त्यामुळे सूर्यप्रकाश सरळ फार्ममध्ये न पडल्याने तापमान जास्त वाढत नाही.
* दोन फार्ममधील अंतर कमीत कमी 20 मीटर असावे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहते.
* पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूने उंच व पसरट पाने असलेले वृक्ष लावावेत, यामुळे उन्हाच्या झळा कोंबड्यांना बसत नाहीत.
* पोल्ट्री फार्मचे छत गव्हाचा किंवा भाताचा कडबा किंवा उसाच्या पाल्याने झाकावे, यामुळे शेडमधील तापमान कमी राहते.
* शेडच्या छतामध्ये व भिंतीमध्ये 2.6 ते 3.3 मी. अंतर ठेवावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
* पोल्ट्री शेडच्या आजूबाजूने पांढरा कलर मारावा, यामुळे सूर्यप्रकाश परावर्तनास मदत होते.
पाण्याचे व्यवस्थापन
* एक पक्षी साधारणतः 2 लिटर पाणी प्रत्येक किलोमागे पितात. 70 अंश फॅरानाइटला प्रत्येक 1 अंश सीच्या तापमानवाढीला पक्षी 4 टक्के जास्त पाणी पितात.
साधारणतः खाद्य व पाणी यांचे 1-2 असे प्रमाण असते. जेव्हा तापमान वाढ 95 अंश रानाइटपेक्षा जास्त असते, हेच प्रमाण उन्हाळ्यात 1ः4 असे होते.
* पक्ष्यांना 45 अंश फॅरानाइट ते 80 अंश फॅरानाइटमध्ये थंड पाणी पिणे आवडते. हेच लहान पिल्लांच्या बाबतीत थंड पाण्याबरोबर इलेक्ट्रॉलॅटिस द्यावेत जेव्हा ते हॅचरीतून फार्मवर आणले जातात.
* पाण्याची भांडी 25 टक्के वाढवावीत व दिवसातून 4-5 वेळा पाण्याची भांडी भरावीत व पाण्याचे तापमान शेडमधील वातावरणापेक्षा कमी असावे.
* स्वच्छ आणि निर्जंतूक पाण्याबरोबरच 0.25 टक्के मीठ टाकावे, यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढते.
खाद्याचे व्यवस्थापन
* पक्षी सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात खातात. त्या वेळेत त्यांना जास्त खाद्य द्यावे.
* 10 टक्के खाद्याची भांडी वाढवावीत, यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
3-3.5 टक्के कॅल्शियमची पातळी वाढवावी.
* साधारणपणे 20-30 टक्के जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि ताणमुक्त मूलद्रव्ये द्यावीत.
* जीवनसत्व ए – 8000 आय यू आणि जीवनसत्व ई -250 मि. ग्रॅ/ कि. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
इतर नियोजन
* स्वच्छ व ताज्या भुश्याच्या 2 इंच जाडीचा थर बनवून त्यावर दिवसातून 2-3 वेळा साधारण पाणी शिंपडावे.
* पक्ष्यांची गर्दी होऊ न देता 10 टक्के जास्त जागा प्रत्येक पक्षाला उन्हाळ्यात देणे गरजेचे आहे.
* कोंबड्यांची जागा बदलणे, त्यांना लसी टोचणे अशी कामे रात्रीच्या वेळी करावीत.
* जास्त उन्हाचा ताण पक्ष्यांवर आल्यावर पक्ष्यांना 2-3 मिनिटे पाण्यामध्ये बुडवावे.
* चोच आणि डोळे पाण्याच्या पातळीच्या बाहेर काढावे.
* पांढरा रंग, चुना इत्यादीचा वापर केल्यास 2 अंश सीने तापमान कमी होते.
* खिडक्यांना बारदाने बसवावीत व दुपारच्या वेळेस ओली करावी.
* स्प्रिंगकलर फार्मच्या बाजूला किंवा शेजवर मारावे.
* एग्झॉस फॅन एका बाजूला आणि झरश्र उेेश्रळपस दुसर्या बाजूला (200 फुट) यामुळे तापमान 8 अंश सेल्सअसने कमी होते.
* अशारितीने आपण उन्हाळ्यात कोंबड्यांचे नियोजन योग्यरीत्या करू शकतो.
(सौजन्य – अॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)
अंकासाठी संपर्क – 9130091621 / 9130091622