पुणे : राज्यात यंदा साखरेच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने सुरु झाल्याने साखर उत्पादन वाढले आहे.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
राज्यात मागीलवर्षी १९० साखर कारखाने सुरु होते. यंदा महाराष्ट्रात २०२१-२२ च्या गळीत हंगामात १४ फेब्रुवारीपर्यंत १९७ साखर कारखाने सुरु झाले आहेत. यात ९९ खासगी व ९८ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांमधून ८६०.९८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यानुसार, १७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राज्यात तब्बल ८७९.१० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे. यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा १०.१८ टक्के इतका झाला आहे.
देशातही वाढले उत्पादन
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशातही साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत देशातील साखरेचे एकूण उत्पादन २३.६० लाख टनांवर पोहोचले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत १९.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. तर चालू वर्षात देशातील ३५१ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात साखरेचे उत्पादन घेतले. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत ३४३ कारखाने सुरू होते. महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरात राज्यातही साखरेचे उत्पादन वाढल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..