कापूर वृक्षाच्या सर्व भागांत असलेल्या तेलपेशींमध्ये कापूर तयार होतो. मात्र खोड आणि पानांतून अधिक प्रमाणात कापूर मिळवितात. या वनस्पतीच्या खोडातील वा पानांतील कापूर तेल ऊर्ध्वपातनाने वेगळे करून त्यापासून कापराचे स्फटिक तयार करतात. याखेरीज ड्रायोबॅलेनॉप्स कॅम्फोरा , ओईओटिआ ऊसम्बॅरेन्सिस तसेच लॉरेसी कुलातील इतर वनस्पतींपासून कापूर तेल मिळवितात. सु. ४५ किग्रॅ. अशुध्द कापूर तेलापासून सु. २२ किग्रॅ. कापूर, सु. ९ किग्रॅ. लाल कापूर तेल, सु. ७.५ किग्रॅ. शुभ्र कापूर तेल व सु. १ किग्रॅ. डांबर इ.पदार्थ मिळतात. आज जगभरात ८०% कापूर कृत्रिम रीत्या तयार करून वापरला जात आहे. गुस्ताफ कोम्पा या शास्त्रज्ञाने १९०३ साली कापराचे स्फटिक कृत्रिम रीत्या तयार केले जातात.
कापुराचे एक झाड अर्धा किलोमीटरच्या रेडिअसमध्ये हवा शुद्ध करते
एक कापुराचे झाड अर्धा किलोमीटरच्या रेडिअसमध्ये हवा शुद्ध करते. शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच. भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो झाडापासून मिळवता येतो. हे झाड शेतातच लावावे. कारण या झाडाचा विस्तार खूप मोठा असतो. ते जवळपास 80 ते 90 फुट उंच वाढते तसेच त्याच्या मुळ्या खूप खोलवर व लांबही पसरतात. त्यासाठी घराच्या बागेत किंवा कुंडीत लावू नए.
कापूरचा शोध कधी लागला..?
कापुराचा शोध अठराव्या शतकात चीनमध्ये लागला असावा. कारण, पूर्वी चीन आणि अरब देशातून कापुराची आयात व्हायची. भारतात देहराडून, कलकत्ता, म्हैसूर इथे कापुराच्या झाडाची लागवड केली जाते.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ११ ते १४ फेब्रुवारी २०२२ @ जळगाव…. खान्देशातील सर्वांत मोठे प्रदर्शन..
आरती करताना कापूर का वापरतात..?
कापूर हा विषाणूरोधक, बुरशीनाशक आहे. त्यामध्ये हवेला शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. मुळात संप्लवनशील असल्यामुळे असाही उघडा ठेवला तरी आपले काम करत राहतो. जर आरतीच्या निमित्ताने त्याचे ज्वलन केले त्याचे गुणधर्म अनेक पटीने त्वरित अनुभवास येतात. याच कारणाने कर्पूर आरती करतात व अशी आरती घेतल्याने मन प्रफुल्लित होते.
एक प्रयोग करून पाहू शकता. औषधाच्या दुकानात नीलगिरीच्या तेलाची बाटली मिळते. ती विकत घ्या व त्यामध्ये भीमसेनी कापुराच्या काही वड्या विरघळवा. आता हा द्रव एखाद्या रूमालावर घेऊन त्याचा वास घ्या. पहा कसे ताजेतवाने वाटते. सर्दी असेल तर त्वरित कमी होईल.
भीमसेनी कापूरच का वापरावा
हा कापूर कापराच्या झाडापासून मिळवतात. हा अतिशय सूक्ष्म प्रमाणात औषध म्हणून अन्य औषधांसोबत पोटात घेतलेला चालतो. प्रमाण जास्त झाल्यास त्रास होतो. वैद्यांच्या सल्ल्यानेच वापर करावा. पूजेसाठी जाळला जाणारा कापूर हा रासायनिक प्रकियेने बनवतात. हा पोटात घेऊ नये. आयुर्वेदीय औषधांमध्ये वापरला जाणारा कापूर हा भीमसेनी कापूर म्हणून ओळखला जातो. शक्यतो पूजेसाठी देखील भीमसेनी कापूरच वापरावा.
शुद्ध कापुराचे उपयोग
* पावसाळ्यात डोळे येण्याचे प्रमाण खूप असते. नियमित कापराची आरती घेतल्यास किंवा शर्टाच्या खिशात किंवा झोपताना उशीच्या दोन्ही बाजूला कापूर वडी ठेवल्यास डोळे येण्याचे प्रमाण नियंत्रित राहते.
* वेदना आणि सूज कमी करणे
* त्वचेवर होणारे रॅशेस कमी करणे
* नखांमध्ये होणारी बुरशी म्हणजे ऑन्कोमायकोसिस ठीक करण्यासाठी पण मदत करते
* त्वचारोग जसे एक्सझेम्मा (इसब) ठीक करण्यासाठी याचा वापर होतो.
* चांगली झोपे येण्यासाठी उपयोगी
* सर्दी आणि खोकला ठीक करण्यासाठी देखील फायदेशीर
* केसाची वाढ करण्यासाठी तसेच डोक्यामधील उवा कमी करण्यासाठी तेलात मिसळून याला घरगुती उपाय म्हणून वापरतात.
कापुराचे झाड भारतातून जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे. लोकांनी कापुराचे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या या झाडाला पुनर्जीवन द्यावे. इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी ही महाकाय झाडे तोडायला लावली व त्याजागी चहा आणि रबराची शेती केली. बहुतांश लोकांना कापुराचे झाड असते, हे ही माहीत नाही.
Pl give contact & phone #
कापुराचे बि किंवा रोपे कुठे मिळेल