अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पण इतिहासात असे अनेक लोक झाले आहेत, ज्यांच्या संपत्तीचा आज हिशोब केला तर इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीपेक्षा त्यांच्याकडे कितीतरी जास्त संपत्ती होती. ‘धनकुबेर’ अशीच त्यांची ओळख होऊ शकते. अनेक अहवाल आणि इतिहासकारांच्या पुस्तकांमध्ये मानसा मुसाचे इतिहासातील सर्वकालीन श्रीमंत व्यक्ती म्हणून मानसा मुसाचे नाव घेतले जाते. कोण होता आणि त्याच्याकडे किती संपत्ती होती…??
टिंबक्टु चा राजा
1280 साली जन्मलेल्या मानसा मुसा ने 1312 मध्ये आफ्रिकेतील माली साम्राज्यावर कब्जा केला होता. मानसा मूसा मीठ आणि सोन्याचा व्यापारी होता. जगातील निम्मे सोन्याचे उत्पादन तो करीत असे. शिवाय जगातील निम्म्या मिठाच्या व्यापारावर मुसाचे नियंत्रण होते. मनसा मुसा चे खरे नाव मुसा किटा असे होते पण टिंबक्टु चा राजा झाल्यानंतर त्याला मानसा ही पदवी मिळाली मानसा म्हणजे सुलतान किंवा सम्राट होय.
तब्बल 4 लाख मिलियन अमेरिकन डॉलर
सन 1324 पर्यंत त्याच्याकडील संपत्ती ची माहिती जगाला नव्हती. मुसाकडे जवळपास 4 लाख मिलियन अमेरिकन डॉलर ची संपत्ती होती. आपल्या कार्यकाळात त्याने साम्राज्याचा विस्तार केला. आज आफ्रिकेतील घाना, सुदान, नायजर, चाड, केनिया हे देश त्याच्या साम्राज्याअंतर्गत येत असत.
दानशूर मुसाकडे 2 लाखांचे सैन्य
एकदा मिस्त्र ची राजधानी काहीरा मधून त्याचा ताफा जात असताना मुसाने काहीरामधील गरिबांना सोन्याचे नाणे दान केले होते. सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे त्याच्या मक्का प्रवासाची. हे सुमारे 1324 आहे. या प्रवासात मानसा मुसाने साडेसहा हजार किलोमीटरचे अंतर कापले होते. त्याच्याकडे दोन लाख लोकांचे सैन्य होते. त्यातील 40 हजार तिरंदाज होते. मानसा मुसा ज्या घोड्यावर स्वार होता त्या घोड्याच्या पुढे 500 लोकांची तुकडी चालवत असे, ज्याच्या हातात सोन्याची काठी होती. मानसा मुसाचे हे 500 दूत उत्तम रेशीम वस्त्र परिधान करायचे. त्याने आपल्या साम्राज्यात अनेक वाचनालय, शाळा, दवाखाने, विद्यापीठे निर्माण केली होती. अशा या दानशूर आणि श्रीमंत माणसाचा मृत्यू 1337 या वर्षी झाला.
जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा विषय निघतो तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम बिल गेट्स, वॉरेन बफेट आणि कार्लोस स्लिम यांच्यासारख्यांची नावे येतात. मात्र, आपल्यापैकी फार थोड्या लोकांना माहित असेल की जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत माणूस हा गरीब समजल्या जाणा-या अफ्रिका खंडात राहत होता. होय, अफ्रिका खंडातील बहुतेक देश अंतर्गत यादवीने ग्रस्त झालेले आहेत. धर्म आणि जातीवर आधारित नायजेरिया, माली, रवांडा, युगांडा आणि सूदानसारख्या देशात रक्ताचे पाटच वाहत असतात. अशा या प्रदेशात 13 व्या शतकात माली साम्राज्याचा एक राजा मानसा मूसा (पहिला) राज्य करीत होता. सेलेब्रिटी नेटवर्थ वेबसाईटच्या माहितीनुासर, या राजाकडे 4 लाख मिलियन डॉलर इतकी संपत्ती होती. आजच्या भारतीय चलनानुसार 24615980000000 रुपये इतकी) होती. हे असे आहे जसे मोजून मोजून तुम्ही संपून जाल. आजचे मूल्य पाहता हा राजा पृथ्वीवरील मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत मानला जातो.
जगातील निम्मे सोन्याचे उत्पादन
या राजाचा देश संपूर्ण जगातील निम्म्यापेक्षा जास्त सोन्याचे उत्पादन करायचा. त्याने खूप मोठ्या मोठ्या मशिदी बनवल्या ज्या आजही उभ्या आहेत. मूसाच्या मृत्यूनंतर त्याचा व्यवसाय व संपत्ती पुढील पिढी सांभाळू शकली नाही. याबाबत सांगितले जाते की, विदेशी फौजांचे आक्रमण व अंतर्गत युद्धात या राजाच्या संपत्तीची लुट करण्यात आली.
मानसा मुसाच्या या भेटीमुळे त्याच्या संपत्तीच्या कथा युरोपीय लोकांच्या कानापर्यंत पोहोचल्या. त्याच्या संपत्तीबद्दल जे सांगितले जात आहे ते किती खरे आहे हे पाहण्यासाठी युरोपातून लोक त्याच्याकडे येऊ लागले.
कॅटलान ऍटलसमध्ये नाव
जेव्हा मानसा मुसाच्या संपत्तीची पुष्टी झाली तेव्हा माली सल्तनत आणि त्याच्या सम्राटाचे नाव कॅटलान ऍटलसमध्ये समाविष्ट केले गेले, त्या काळातील एक महत्त्वाचा नकाशा. 14 व्या शतकातील कॅटलान ऍटलस त्या वेळी युरोपियन लोकांना माहित असलेल्या सर्व ठिकाणांचे वर्णन करते.