शेळयांना खाद्यही खूप कमी प्रमाणात लागते. त्यामुळे अल्प भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. खाद्याचे, शेळयांच्या आरोग्याचे , निवार्याचे व पिण्यासाठी लागणार्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.
बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त शेळीपालन..
भारतामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांसाठी लागणारा चारा हा शेळयांना गोठयामध्येच पुरवला जातो. अर्ध बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्याबरोबर शेतातील व बांधावरील बर्याच वनस्पती मिळतात. यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.
अल्प गुंतवणुकीचा व्यवसाय..
हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही सुरू केला जाऊ शकतो. काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्यांमध्ये दोनदा वितात. त्यातही शेळ्यांमध्ये प्रामुख्याने एकाचवेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी ते फायदेशीर आहे.
# पैशांची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो म्हणून शेळ्यांना ATM (Any Time Money) सुद्धा म्हणतात.
# शेळी हा प्राणी काटक असतो. विपरीत हवामानाशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता असते.
# त्यांचे वेत लवकर येतात म्हणून
त्यांचे उत्पादन लवकर वाढते. लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास जागाही कमी लागते.
# त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.
# बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे. यांचे मांस चविष्ट असते. तसेच त्यांच्या शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात.
यशस्वी शेळीपालकांचे अनुभव..
महिला असूनही अर्धबंदिस्त पद्धतीने यशस्वी शेळीपालन; प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक नुकसानीची शक्यता कमी
लाडकी (ता. मोर्शी, जि. अमरावती) या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या संगीता ढोके यांचा शेळीपालन विक्री व्यवसाय आज नावारूपाला आलेला आहे. विशेष आर्थिक कमाईतील दोन टक्के हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी खर्च करतात. त्या सांगतात, शेळी व्यवसायाकडे आता उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. शेळीपालन व्यवसायात पर्दापण करणार्या तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे व्यवसायात प्रारंभी अनेक अडचणी येतात. तरुणांनी प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक नुकसानीची शक्यता बरीच कमी होते, हे मी अनुभवावरून सांगते. येत्या काही महिन्यात गुंटूर मेढींचे संगोपन करणार आहे.
– संगीता ढोके मो.नं. 8830406401
अॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
Contact – 9130091621- Hemlata
9130091622- Vaishali
देशी-विदेशी शेळीपालनातून वर्षाला 4 लाखांचा नफा; शेतीपेक्षा शेळीपालनात अधिक नफा
भाऊसाहेब देसले यांनी 2005 मध्ये शेळीपालनास सुरवात केली. स्थानिक बाजारातून 2 ते 3 शेळया विकत घेऊन सुरू झालेला व्यवसाय आता 200 शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे. शेळीपालनाची मला लहानपणापासूनच आवड होती. वडीलोपार्जित तीन एकर शेती असल्यामुळे गुरे पालनाचा अनुभवही गाठीशी होता. त्यामुळे शेळीपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायातून लॉकडाऊन काळातही वर्षाकाठी 9 ते 10 लाखांची उलाढाल होऊन 4 लाखापर्यंत निव्वळ नफा मिळत आहे. शिवाय मागणी अजून वाढत असल्याने एक हजार शेळयापर्यंत व्यवसाय वाढविण्याचा विचार आहे. शेळीपालन करतानाच 2009 ते 11 या तीन वर्षांत कापूस लागवडही करुन पाहिली. परंतु, लहरी निसर्गामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, आता शेळीपालनातून शाश्वत उत्पन्न मिळत आहे. दिवसेंदिवस या व्यवसायाला असलेली मागणी वाढत आहे. त्यामुळे इतर शेतकर्यांनीही शेळीपालन केल्यास त्यांना यातून चांगलाच फायदा होईल.
भाऊसाहेब देसले मु.दलवाडे पो. विरदेल ता. शिंदखेडा जि.धुळे
9422372313