‘द बीग मेपल लीफ’ नावाचे शुद्ध सोन्याचे नाणे जगातील सर्वात मोठे नाणे होते. 9.999 शुद्धतेचे हे नाणे रॉयल कॅनेडियन मिंटने 1982 मध्ये बनवले होते, ज्यात राणी एलिझाबेथ II चा फोटो कोरलेला होता. या नाण्याची किंमत 30 कोटी, 38 लाखांपेक्षा जास्त होती. 53 सेंटीमीटर उंची आणि ३ सेंटीमीटर जाडी असलेले हे नाणे जर्मनीच्या बर्लिन मधील बोडे संग्रहालयात ठेवले गेले. याचे वजन तब्बल 100 किलोग्राम होते.
या नाण्यावर कोरलेल्या राणी एलिझाबेथ II चे चित्र कॅनेडियन कलाकार सुझाना ब्लंट यांनी बनवले होते, तर दुसरीकडे मॅपलच्या मोठ्या पानांचा फोटो होता. 2007 मध्ये बिग मेपल लीफ नावाच्या या सोन्याच्या नाण्याची जगातील सर्वात मोठे नाणे म्हणून गिनीज बुक अँड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या नाण्याबद्दल जगभरातील लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कदाचित यामुळेच ते चोरांच्या नजरेत आले. मार्च २०१७ मध्ये या संग्रहालयातून त्याची चोरी झाली. तपासादरम्यान पोलिसांनी कही आरोपींना अटक केली, परंतु नाणे सापडू शकले नाही, चोरांनी नाणे वितळवून ते नष्ट केले असावे असा पोलिसांचा निष्कर्ष आहे.