• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पारंपारिक दुध व्यवसाय आधुनिकीकरणामुळे भरभराटीस

दुधव्यवसायाला मुरघास निर्मितीची जोड

Team Agroworld by Team Agroworld
June 30, 2021
in यशोगाथा
1
पारंपारिक दुध व्यवसाय आधुनिकीकरणामुळे भरभराटीस
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सोनगाव (ता. राहुरी) येथील राजेश बाळकृष्ण अंत्रे व गणेश बाळकृष्ण अंत्रे या दोघां भावंडानी कुकुटपालन, ससेपालन, गांडूळखत निर्मिती या विविध व्यवसायात अनुभव घेतल्यानंतर आज ते आपल्या पारंपारिक सुरु असलेल्या दुग्धव्यवसायात स्थिरावले आहेत. आठरा वर्षापुर्वी तीन गाईंपासून सुरु केलेल्या पारंपारिक दुध व्यवसायाचे आधुनिकीकरण करून आज हा व्यवसाय तीस गाईपर्यत नेला. त्यांनी पारंपारिक गोठ्याएवजी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अत्याधूनिक व तांत्रिक बाबीनुसार गोठा उभारला. दुध व्यवसायाला मुरघास निर्मिती, विक्रीची जोड दिली. मुरघास तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेले कुट्टी मशीन खरेदी केले. शेतीतही मजुरांऐवजी यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादनात वाढ केली. दुध व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक १३ लाखांची उलाढाल करत आहेत.

राज्यात नगर जिल्हा म्हणजे दुग्धोत्पादनासाठी प्रगत समजला जातो. याच पट्ट्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील ३६ वर्षीय राजेश बाळकृष्ण अंत्रे व ३५ वर्षीय गणेश बाळकृष्ण अंत्रे ही दोघे भावंडे. राजेश यांचे पदवीत्तर, गणेश पदवीचे शिक्षण. त्यांची वडिलोपार्जीत पाच एकर बायागती शेती आणि वडीलांचा पारंपारिक दुध व्यवसाय. आठरा वर्षापुर्वी वडीलांचे निधन झाले. शेतीला व  व्यवसायाला आई लता यांचे पाठबळ आहे. वडिलांच्या निधनावेळी त्यांच्याकडे तीन गाई होत्या. त्यावेळी राजेश हे आकरावीत शिकत होतो. पदवीचे शिक्षण पुर्ण केले आणि नोकरी न करता दोघ भावंडांनी 2013 साली शेती व वडीलांनी सुरु केलेला दुध व्यवसाय करुन तो वाढविण्याचे ठरविले. मात्र अनेक अडचणी येत असल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निश्चय केला. दुसऱ्या व्यवसायाला काहीतरी अनुदान मिऴेल या आशेने बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रातील डाॅ. भास्कर गायकवाड यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असता. डाॅ. गायकवाड त्यांच्यासह संभाजीराव नालकर यांनी सांगितले. कोणताही व्यवसाय तोट्यात नसतो. तो आपण कसा करतो यावर अवंबून आहे. हे सांगतानाच पिढीजात दुध व्यवसाय पारंपारिक पद्धतीने नव्हे तर नवीन तंत्रज्ञानावर आधारित करण्याचा आणि त्याला जोड व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.
याबाबत त्यांनी सतत दोन वर्ष मार्गदर्शन केले. त्यानुसार मुक्त तांत्रिक आधारावर गोठा केला. तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन करत तीन गाईंच्या तीस गाई झाल्या. जोड व्यवसाय म्हणून मुरघास तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला.

जुन्या व्यवसायाची नव्याने उभारणी
कृषी विज्ञान केंद्रातील मिळालेल्या मार्गदर्शनानुसार अंत्रे बांधवांनी 2013 साली जुन्या व्यवसायाची नव्याने उभारणी करण्याचे ठरविले. त्यांनी सर्वप्रथम तांत्रिक गोठ्याच्या उभारणीला सुरवात केली. आधीच्या गोठ्यात बदल केला. पुर्वी शेडची उंची 8 फुट होती. मात्र उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होत होता, हवा खेळती राहत नव्हती, त्यामुळे 12 फुट उंची घेतली. त्यातून हवा खेळती झाली. उन्हाचा त्रास कमी झाला. प्रत्येक गाईंला 200 स्क्वेअर जागा लागेल या आकारानुसार 60 बाय 80 आकाराच्या दोन गोठ्याची उभारणी केली. चारा वाया जाणार नाही, त्यानुसार गाईंना जमीन स्तरावर चारा खाता यावा यासाठी तांत्रिक पद्धतीने दिड बाय दोन व शंभर फुट लांबीची चारा गव्हाण केली. गाय चारा खाण्यासाठी व दुध काढणीच्या वेळी शेण व गोमुत्र सोडते. शिवाय गाय सतत पाय हलवत असते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तेथे खड्डे तयार होतात. असे खड्डे न पडण्यासाठी गाईं चारा खाण्याच्या, दुध काढण्याच्या निश्चित केलेल्या जागेवर 100 बाय 14 आकाराचा सिमेंट कोबा केला.  गोचिड निर्मुलानासाठी व पाण्याच्या टाकीला शेवाळ येऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा पाण्याच्या व महिन्यातून एकदा चारा गव्हाणीला चुना मारतात.
गोठ्याचे तांत्रिक व्यवस्थापन
चाऱ्यातून जे प्रोटीन भेटत नाहीत ते खुराकातून देण्याचे नियोजन केले जाते. गाईला सरसकट खुराक न देता त्या गाईंच्या दुध उत्पादन क्षमतेनुसार खुराक दिला जातो. वीस लिटर दुध देणाऱ्या गाईला सात किलो खुराक दिला जातो. मिनरल मिक्चरचा दर दिवसाला एका लिटरला पाच ग्रॅम याप्रमाणे वापर केला जातो. हत्तीगवत, मेथी घास, मुरघास व गव्हाचा भुसा याच्या मिश्रणाचा चारा गाईंच्या वजनानुसार दिला जातो. पाचशे किलो वजनाच्या व वीस लिटर दुध देणाऱ्या गाईला दिवसभरात पंचवीस किलो हिरवा चारा व चार किलो वाळलेला चारा दिला जातो. गाभण काळात सकाळी -संध्याकाळी प्रत्येकी एक किलो खुराक नियमितपणे देतात.
गाईच्या प्रसुतीसाठी स्वतंत्र वार्ड असून जन्मानंतर वासराला दहा मिनिटात नाळ बांधणे, तीन दिवस तीनवेळा इन्फेक्शन होउ नये म्हणून ओषधात बुडवणे, वासराला एका तासाच्या आत बाटलीने गाईचे दुध पाजणे हे नियम काळजीपूर्वक पाळले जातात. जन्मानंतर पुढील दोन महिने वजनाच्या दहा टक्के दुध पाजतात. पाचव्या दिवसापासून पुरेसे पाणी देतात. कालवडीसाठी दोन महिने स्वतंत्र निवाऱ्याची व्यवस्था ठेवली जाते. वयाच्या पंधराव्या दिवसापासून वासरासाठी असलेली गोळीपेंड खाद्यात दिली जाते.

सतत शिकण्याची वृत्ती
नगर जिल्ह्यातील दुध व्यवसायीक व अभ्यासक रवी नवले यांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात व्हाटसअॅपचा हिरकणी ग्रुप केला. त्यात राज्यातील शंभर दुध उत्पादकांसह गाईंच्या बाबत वेगवेगळा अभ्यास असलेले वीस पशुवैद्यकीय डाॅक्टर आहेत त्यातूनही नवनवीन माहिती मिळते. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी आॅनलाईन प्रशिक्षण केले. आतापर्यत 40 वेळा आॅनलाईन प्रशिक्षणातून दर्जेदार सिमेन्सची माहिती मिळाली. हवे ते सिमेन्स मिळत नसल्याने ते अपल्याकडे वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी स्वःखर्चाने सिमेन्स नायट्रोजन कॅन खरेदी केला.
 गाईंच्या लागवडीच्या, वासराच्या जन्माच्या, लसीकरणाच्या पाॅवर गोठा अॅपमध्ये नोंदी केल्या जातात.
वर्षातून दोनदा लाळ्या खुरकुताचे लसीकरण, नुकसान टाळण्यासाठी वर्षातून एकदा रक्ताची तपासणी करून  गोचीड तपाचे लसीकरण कटाक्षाने केले जाते. भविष्यातील गर्भपाताचा धोका टाळण्यासाठी चार ते पाच महिने वयाच्या कालवडीसाठी एकदाच होणारे ब्रुसेलाचे लसीकरण देखील केले जाते.
दुग्धव्यवसायाची आर्थिक उलाढाल
अंत्रे बंधूंच्या गोठ्यात आज रोजी एकून गायी 16 (एचएफ), कालवडी 14 आहेत. उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या एमडीडीबीच्या अॅटलस व फार या बुलच्या दोन कालवडी, बायफ सिमेन्सचे अभिराज व अथर्वच्या दोन कालवडी व एबीएस सिमेन्सची ज्युपीटरची एक अशा सहा कालवडी आहेत. एकून दोन्ही वेळेचे १३० लिटर दुध संकलन होते. त्याची २८ रु ली. दराने विक्री केली जाते. यातून सर्व खर्च वजा जाता महिन्याला ५० हजार रु शिल्लक राहतात.

मुरघास निर्मिती
सहा वर्षापर्वी परिसरातील लोकांनी एकत्र येऊन बचत गट केला होता. चारा कुट्टीसाठी आठ वर्षापुर्वी मशीन खरेदी केलेले होते. त्याच आधारासहा वर्षापासून मुरघास निर्मिती सुरु केली आहे. दिवसभरात सुमारे 75 ते 80 टनाची कुट्टी करणाऱ्या मशीनची चार वर्षापुर्वी खरेदी आहे. त्याच वेळी टॅक्टरही खरेदी केले. स्वतः मुरघास तयार केल्यानंतर लोक पाहायला येऊ लागले. त्यानंतर आता लोकांनाही मुरघास बनवून देऊ लागलो. सध्या वर्षभरात सहाशे ते सातशे टन मुरघासाची विक्री करतात. त्यासाठी मशीन व अन्य कामासाठी वीस लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. त्यासाठी गरजेनुसार लोकांकडून मकाची खरेदी केली जाते. महिन्याला १५ बॅग  ४ हजार रु दराने विक्री केल्या जातात. त्या माध्यमातून सात लाखांची वार्षिक उलाढाल होते.

अपयशाने खचलो नाही…
दहा वर्षापुर्वी 100 देशी कोंबड्याचा एक वर्ष प्रयोग. त्यानंतर ब्रायलरचे एक वर्ष प्रयोग केला. दोन्हीतही अपयश आले. त्यानंतर सहा महिने ससेपालन केले. त्यातही तोटाच झाला. त्यानंतर गांडूळ खत प्रकल्प केला. महिन्याला चार टन खत तयार केले. मात्र त्यालाही त्या काळात फारसी मागणी रहिली नाही. कुटूंबातील लोक नाराज झाले. त्यानंतर हे सर्व बंद करुन त्याकाळात नव्याने ठिंबकची मोहिम सुरु झाली. मात्र आम्ही दहा तरुणांनी एकत्र येऊन इतर शेतकऱ्यांच्या शेतात ठिंबक सिंचन संच जोडणीचे कामे सुरु केले. वर्षभर हे काम केल्यानंतर बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क आला आणि आयुष्याला वळण मिळाले. शेवटी पारंपारिक पद्धतीने न करता तांत्रिक आधारावर आणि कष्ट कमी करण्यासाठीचे तंत्र वापरुन दुध व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्याच काळात मक्याचे हायड्रोपोनिक चाऱ्याची वर्षभर निर्मिती केली. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आदर्श गोपालक, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राने आदर्श दुध उत्पादक शेतकरी पुरस्कारने गौरव केला आहे.

ठिंबक सिंचनवर चारा उत्पादन
वडिलोपार्जित पाच एकर शेतीचे चाऱ्यासाठी नियोजन केले. त्यात मुरघासासाठी एका एकरावर मका, दोन एकरावर मेथी घास, एक एकरावर संकरित ज्वारी (मेगा स्वीट) लागवड. तर एक एकरावर भुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते. सहा वर्षापासून ठिंबक व तुषार सिंचनचा वापर करुन चारा उत्पादन करतात. मजुर टंचाई कमी करण्यासाठी शेतात टॅक्टर, रोटाव्हेटर, नांगर, पेरणीयंत्राचाही प्रामुख्याने वापर करतात. गाईंच्या मुक्त गोठ्यातील दर तीन दिवसाला शेणखताची उचलणी करतात. त्यासाठी टॅक्टरला जोडणारे खत भरणीयंत्र स्थानिक पातळीवर तयार करुन घेतले. वर्षभरात चाळीस टन खताची उपलब्धता होत असून वीस टन चाऱ्यासाठी स्वतःच्या शेतीत वापर तर वीस टन खताची शेतकऱ्यांना विक्री करतात. त्यातूनही चांगली उलाढाल होते

संपर्क ः गणेश अंत्रे ः 9763042470

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कुकुटपालनकृषी विज्ञान केंद्रगांडूळखत निर्मितीदुग्धोत्पादनपशुवैद्यकीय डाॅक्टरपाॅवर गोठा अॅपमुरघासससेपालन
Previous Post

वेळीच करा मक्यावरील खोडकिडचे नियंत्रण

Next Post

एकरी चार महिन्यात चार लाखांचे उत्पन्न.

Next Post
एकरी चार महिन्यात चार लाखांचे उत्पन्न.

एकरी चार महिन्यात चार लाखांचे उत्पन्न.

Comments 1

  1. Khatale says:
    4 years ago

    Ati chhan

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.