प्रतिनिधी/जळगांव
आघाडीची बियाणे कंपनी अजित सीड्सने कापूस बियाण्यांच्या बाबतीत देशात भरीव असे कार्य केले आहे. खान्देशातही अजित सीड्सच्या कापूस बियाण्याचा बोलबाला आहेच. खान्देशात कापूस बियाण्याच्या खालोखाल कंपनीचा सर्वात जास्त विक्रमी खप हा गहू बियाण्याचा आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडपैकी सर्वात मोठा वाटा हा अजित सीडसचा असल्याचा दावा अजित सीड्सचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुनील मुळे यांनी केला. जळगाव येथील अॅग्रोवर्ल्डच्या मुख्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
श्री. मुळे यांनी या भेटीत त्यांचा विदर्भ (यवतमाळ) ते खान्देश (जळगाव) असा प्रवास देखील उलगडला. वडील डॉक्टर असल्याने साहजिकच आपणही याच क्षेत्रात यावे असे वडिलांना वाटत असतांना त्यांनी मात्र राज्यशास्त्र विषयात पदवी घेत पत्रकारिता सुरु केली. यानंतर कालांतराने अजित सीड्स या बियाणे कंपनीत काम सुरु केले. शेती क्षेत्राशी थेट संबंध नसतांना त्यांनी अजित सीड्स या कृषी बियाणे संबंधित कंपनीत उल्लेखनीय कार्य केले. कंपनी सोबत निष्ठा व प्रामाणिकपणा, शेतकरी व वितराकांसोबत वैयक्तिक जिव्हाळ्याचे असलेले संबध हीच काय माझी जमेची बाजू असल्याने मला एकाच कंपनीत एकाच ठिकाणी सलग तीन दशकांहून अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली. अजित सीडसमधील कामामुळे मला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. अर्थात हे सर्व अजित सीडसचे अध्यक्ष पद्माकर मुळे व व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचे श्री. मुळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
शेतकऱ्यांचे बियाण्याबाबतचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यात हातखंडा असलेल्या मुळे यांचे आजही खान्देशातील शेतकऱ्यांशी घनिष्ट ऋणानुबंध आहेत. याबाबत त्यांनी काही उदाहरणही दिले. अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सुनील मुळे यांचे स्वागत केले.