• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इतिहास गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – ४ बाजी प्रभू

Team Agroworld by Team Agroworld
December 19, 2020
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

   आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या प्रत्येक भागात,  काण्याकोपऱ्यात जाज्वल्य देशभक्ती,  दैदीप्यमान राष्ट्राभिमानाने भारलेले अनेक वीर योद्धे होऊन गेलेत. तळहातावर शीर घेऊन लढलेल्या या योद्ध्यांचा ज्ञात-अज्ञात इतिहास आपल्या नवीन पिढीला माहीत व्हावा, त्यांना तो सतत सन्मानाची, अभिमानाची व अतुल्य पराक्रमाची प्रेरणा देणारा ठरावा, हाच प्रमुख उद्देश या इतिहासाच्या उजळणीत आहे. हा इतिहास गोष्टीरुपात देण्याचा प्रयत्न असल्याने आपल्या घरातील मुलांना आपण एकत्रितपणे वाचून दाखविल्यास यातून त्यांची  जडणघडण होऊन राष्ट्राभिमानी भावी पिढी तयार होण्यास निश्चीतच मदत होईल.  

दोन प्रहरची वेळ असूनही हवेतला गारवा कमी झाला नव्हता. दोहों बाजूंच्या हिरव्या गर्द रानांतून बाजी, फुलाजी दौडत होते. पाठीमागून शिबंदी धावत होती. आकाशात चढलेला रोहिडा किल्ला नजरेत येत होता.
किल्ल्याच्या प्रथम दरवाज्याशी पहारेकऱ्यांचे मुजरे स्वीकारून बाजी-फुलाजींनी किल्ल्यात प्रवेश केला. बांदल देशमुखांच्या वाड्यापुढं दोघे पायउतार झाले. वाड्याच्या नगारखान्यातून आत जाताच त्यांचं लक्ष सदरेकडं गेलं.
नक्षीदार शिसवी खांबांनी सदर सजली होती. प्यालेल्या तेलामुळं त्या खांबांना एक वेगळाच तजेला प्राप्त झाला होता. सदरेवर कृष्णाजी बांदलांची खास माणसं बसली होती.
कृष्णाजी बांदलांनी साठी ओलांडली असली, तरी त्यांचा ताठा कमी झाला नव्हता. कानाच्या पाळीपर्यंत आलेले भरघोस कल्ले, ओठावरच्या पिळदार मिशा त्यांच्या गोल चेहऱ्याला शोभत होत्या. कृष्णाजी उंचीला कमी असले, तरी त्यांचा बांधा भरदार होता. पांढराशुभ्र अंगरखा आणि पायांत तंग विजार घातलेले कृष्णाजी सदरेच्या मधून येरझाऱ्या घालीत होते. त्यांच्या हाती हुक्क्याची नळी होती. त्यांच्या पावलांचा अंदाज घेऊन परातीत हुक्कादान घेतलेला सेवक त्यांच्याबरोबर चालत होता.
कृष्णाजी बांदलांचं लक्ष बाजी- फुलाजींकडं गेलं. त्यांना पाहताच त्यांच्या नमस्काराचा स्वीकार करून कृष्णाजी म्हणाले,
‘या ! बाजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.’
बाजी- फुलाजी सदरेवर गेले.


कृष्णाजी बांदलांना उसंत नव्हती. त्यांचे सल्लागार भास्करपंत यांना ते म्हणाले,
‘द्या ! बाजींना तो भोसल्यांचा खलिता द्या ! मी सांगतो, ही अक्कल त्या शिवाजी भोसल्याची नव्हे. ही ऽ ही त्या दादोजी कोंडदेवांची आहे.’ हुक्क्याचा झुरका घेऊन ते हुक्क्याची नळी हातात उंचावत म्हणाले, ‘ते विसरले असतील, पण आम्ही विसरलो नाही. आमच्यावर हा दादोजी चालून आला असता आम्ही त्याचे स्वार पिटाळून लावले. घोड्यांच्या दांड्या तोडल्या. शिवापूर गाठेपर्यंत त्याला पुरेवाट झाली. एकदा मार खाऊन गेला, तरी अक्कल येत नाही.’
कृष्णाजी बांदलांचं लक्ष खलिता वाचण्यात गढलेल्या बाजींच्याकडं गेलं.
कृष्णाजीपंतांचा संताप उफाळला.
‘बघा ! त्या भोसल्याची भाषा बघा ! ते, म्हणे, बारा मावळचे जहागिरदार ! शहाजी भोसल्याची जहागीर, म्हणे ! आणि आम्हांला विचारतो, राजे केव्हापासून झालात ! हो हो ! आम्ही राजे म्हणवितो. आमची हिरडस मावळात सत्ता आहे ! म्हणावं, ज्याच्या हाती ससा असतो, तोच पारधी.’
कृष्णाजी बांदलांचे गाल बेडकासारखे थरथरत होते. नाकाचा शेंडा तांबडाबुंद झाला होता. हुक्क्याचे दोन झुरके घेऊन क्षणभर थांबत आणि तरारा चालत ते बोलत होते,
‘आम्हांला सांगतो ! आम्ही, म्हणे, प्रजेवर बदअंमल करतो. शिवाजीच्या कागाळ्या विजापूरला कळवतो ! का कळवणार नाही ? आम्ही चाकरी करतो, ती बादशहांची ! ते बादशहाच ! येवढ्या तक्रारी केल्या, तरी अजून झोपेत आहेत. समजेल एक दिवस, शिवाजी म्हणजे काय, ते !’
बाजींनी शिवाजीचा खलिता लक्षपूर्वक वाचून, तो खलिता परत भास्करपंतांच्या हाती दिला.
कृष्णाजी बांदलांनी विचारलं,
‘बाजी, काय म्हणता ?’
बाजींनी भास्करपंतांकडं पाहिलं आणि विचारलं,
‘पंत ! तुमचा काय सल्ला आहे ?’
भास्करपंत आवंढा गिळत म्हणाले,
‘नाही, म्हणजे त्याचं काय आहे; शिवाजी भोसल्याचा पुंडावा वाढतो आहे, हे खरं ! पण त्यासाठी वैर पत्करण्याऐवजी सलूख होतो का, पाहावं. ते नाही जमलं, तर मग आहेच शेवटचा मार्ग.’
‘म्हणजे, लढाई ना ?’ बाजी हसून म्हणाले.
‘लढार्इ !’
बांदलांच्या तोंडात हुक्क्याची नळी तशीच राहिली. दुसऱ्या क्षणी हुक्कादान घेतलेल्या सेवकाच्या कानशिलावर त्यांची चपराक उठली. ते गर्जले,
‘हरामखोर, हुक्क्यात इंगळ नाही आणि माझ्यामागून नुसता फिरतो. चाकरी सोड आणि देवीचा तळेकरी हो.’
सेवक हुक्कादान घेऊन वाड्यात धावत गेला. कृष्णाजी बांदल भानावर आले. शंकित नजरेनं बाजींच्याकडं पाहत ते म्हणाले,
‘पण, पंत म्हणतात, तसा प्रयत्न करून पाहिला, तर…’
‘राजे ! म्हणजे सलोखा करावा, म्हणता ?’ बाजींनी विचारलं.
‘उगीच कटकट कशाला वाढवावी ? तो येऊ दे. बघू, काय म्हणतो, ते.’
बाजी हसले. ते म्हणाले,
‘तो येतो, तेव्हा काही म्हणत नाही. तो करून मोकळा होतो.’
‘आँ !’ कृष्णाजींनी टाळा वासला.
‘राजे, हा शिवाजी आज कोंढाणा, चाकण, तोरणा, रायगड, पुरंधर, आणि जावळी घेऊन मोकळा झाला आहे. हे गड, हा मुलूख कसा घेतला ? पुरंधरवर भावांची भांडणं मिटवण्यासाठी याला बोलावला. त्यानं त्या भांडणाचा फायदा घेऊन गड ताब्यात घेतला. जावळी अशीच विश्वासघातानं काबीज केली. मोऱ्यांचं पारिपत्य करण्यात यश मिळवलं. येवढंच कशाला ! खुद्द त्याचे मामा सुपेकर मोहिते; त्यांच्याकडं दिवाळीची खुशाली मागायला जाऊन, त्याच आपल्या मामाच्या मुसक्या आवळून त्याला बेंगळूरला पाठवलं. तो शिवाजी उद्या या गडावर घेतलात, तर तो काय बनाव करील, याचा विश्वास भास्करपंत देतात ?’
त्या शेवटच्या सवालानं भास्करपंत दचकले. त्यांचं दंतहीन थोबाड वासलं गेलं. आवंढा गिळत ते म्हणाले,
‘ते खरं… मी तसं नाही म्हणत… पण..’


‘पंत, पण नाही.’ बाजी निश्चयानं म्हणाले, ‘राजे, जगायचं, तर मानानं जगावं. आपण आदिलशहाचे नोकर. आज ना उद्या या शिवाजीवर आदिलशाही तुटून पडेल. पडावंच लागेल. शिवाजीचा पराभव झाला की, शिवाजीशी हातमिळवणी करणाऱ्या साऱ्यांवर आदिलशाहीची वक्रदृष्टी होईल. त्या वेळी आपलं भवितव्य काय राहील ? आदिलशाही विरुद्ध टक्कर द्याल ?’
त्या सवालानं कृष्णाजी बांदलांना थरकाप सुटला.
‘आम्ही तसं कुठं म्हणतो ? बाजी, आम्हांला तुमचा सल्ला हवा.’
‘आमचं स्पष्ट मत आहे. हा शिवाजी मोठा होण्याआधी त्याचा पुंडावा मोडायला हवा. त्याला बांदलांचं एकच उत्तर जाईल…’
‘काय ?’
‘उद्या चाल करून येणार असाल, तर आजच या. आम्ही वाट बघतो.’
साऱ्यांनी बाजींचा निर्णय मान्य केला. नव्या आणलेल्या हुक्कादानाची चव घेत कृष्णाजी म्हणाले,
‘वैर पदरात घ्यायचं, तर पुरं घ्यावं, त्या शिवाजीला खरमरीत उत्तर पाठवा. आणि हे बघा, आता तुम्ही, फुलाजी गडावर ऱ्हावा. तो कधी येईल, सांगता यायचं न्हाई. गड मजबूत ठेवा.’
सौजन्य :-   सर्व क्रमशः लेख ( सोशल मिडिया )

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आदिलशहाकृष्णाजी बांदलकोंढाणागौतमाईचाकणछत्रपतीजावळीढालतोरणापावनखिंडपुरंधरबाजीमहाराजमिशीयशवंतराजेरायगडसिंधगावसोनाबाईस्वराज्य
Previous Post

महाडीबीटी पोर्टल योजना: अर्ज एक, योजना अनेक

Next Post

थेट मेळघाटातून… आदिवासींच्या आदर्श रीतीपद्धती

Next Post
थेट मेळघाटातून…  आदिवासींच्या आदर्श रीतीपद्धती

थेट मेळघाटातून... आदिवासींच्या आदर्श रीतीपद्धती

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.