• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोरोनाच्या संकटाला संधी बनविणारे सुपरहिरोज…

शेतकऱ्यांचा 31 कोटी रुपयांच्या भाजीपाला व फळांच्या विक्रीचा विक्रम

Team Agroworld by Team Agroworld
September 25, 2020
in यशोगाथा
1
कोरोनाच्या संकटाला संधी बनविणारे सुपरहिरोज…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कोणतेही संकट आले की त्याचा पहिला वार शेतकऱ्यावर येतो तसा काही महिन्यापूर्वी अस्मानी संकटाशी दोन हात करून उभा असलेल्या बळीराजावर कोरोना विषाणूने जणू हल्लाच केला. देशभरातील  लॉकडाऊनमुळे संपूर्ण शेतकरी जमात संकटाच्या खाईत लोटली गेली. मातीमोल झालेला, फेकला जात असलेला शेतीमाल, त्या सबंधित बातम्या पाहून या वेळी नेहमीपेक्षा जास्त लोकांनी अरे-अरे म्हणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. सर्वत्र आभाळ कोसळले म्हणून या वेळी शेतकरी देखील नेहमीपेक्षा अधिक खचला होता. कुरुक्षेत्रावर येन युद्धात अजिबात न लढण्याचा निर्धार केलेल्या अर्जुनासारखे हताश शेतकरी पाहून कृषी विभागातील खरेखुरे हिरो पुढे आले आणि शेतीमध्ये “व्यापार क्रांती” झाली. एवढी वर्ष शक्य झाले नाही ते कोरनामुळे निर्माण झालेल्या संधीने करून दाखविले. शेतकऱ्यांमध्ये या संधीचा आत्मविश्वास पेरणारे सुपर हिरो ठरला जळगाव कृषी विभाग.


जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार यांनी केलेल्या नियोजन व सक्रीय सहभागामुळे शेतकरी ते ग्राहक या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री करत सुमारे 31 कोटी रुपयांच्या  उलाढालीचा विक्रम झाला. कृषी विभागाने पेटवलेल्या शेतकर्यांमध्ये आत्मविश्वासाच्या ठिणगीने वणव्याचे रूप घेत व्यापारी लॉबीला मोठा हादरा दिला. या भयावह संकटात कृषी विभागामुळे उदयाला आलेला उठाव नव्या कृषी क्रांतीची बीजे रोवणारा ठरला आहे. थेट ग्राहकांना शेतमाल विकता आल्याने होणारे नुकसान तर टळलेच शिवाय ग्राहकांनाही माफक दरात ताजी फळे व भाजीपाला देत नागरिकांची होणारी गैरसोय टाळली.

संकटकाळीन अन्नदाता

अनादी काळापासून जगाला कृषी व ऋषी संस्कृतीचा वारसा आहे. जगाचा मागील काही वर्षांचा विपत्तीचा इतिहास पहिला तर प्रत्येक वेळी या दोन्ही संस्कृतीनी संपूर्ण मानव जातीला प्रत्येक आपत्ती मधून बाहेर काढले आहे. संपूर्ण मानव जातीचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण या एका विषाणूने क्षणार्धात प्रभावित केले. प्रदुर्षण, जागतिक तापमान वाढ यासाठी जणू निसर्गाने हा एक घेतलेला विरामच जणू, संपूर्ण जग हे घरातच बंदी झाले आणि निसर्गाने कात टाकत नवीन जन्म घेतला कि काय इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाले.
काहीशी अशीच स्थिती आपल्या देशात, राज्यात, जिल्ह्यात सर्वत्र आहे. करोडो जनता ही क्षणात घरात बंदिस्त झाली. पण घरात राहून खाणार काय सोबत असलेला साठा किती दिवस पुरणार तेव्हा अश्या स्थितीत पुन्हा अनादी काळापासून जगाला तारणारा कृषी संस्कृतीचा वारसा सांगणारे शेतकरी पुढे आले. अशा भयावह परिस्थितीतही ते अन्न धान्य पुरवठा करून शहरातील बंदिस्त जनतेला मोलाची साथ देत पुढे आले. कोरोना विषाणू सोबत लढताना जे वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा यंत्रणा व इतर यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत, त्याच प्रमाणे नेहमी निसर्गाच्या लहरीपनाचा बळी ठरणारा अन्नदाता तितकाच महत्वाचा ठरला आहे.

कोरोना आणि शेतीवरील संकट
  ज्या प्रमाणे या स्थितीत सर्व जनमानसाचे अर्थकारण प्रभावित झाले त्याच प्रमाणे राज्यातील शेतकरी सुद्धा प्रभावित झाला. रब्बी हंगाम बहुतांश हाताशी आला असतांना ही आपत्ती आली काहींनी शेतमाल विक्री केला तर काहींचा अजून बाजारात न्यायाचा बाकी होता, कित्येक शेतकऱ्यांचा भाजीपाला, केळी, फुले, फळे यासारखी उत्पादने लॉकडाऊन मुळे व्यापारी वर्गाने नाकारली. विक्री अभावी हा शेतमाल खराब होऊ लागला त्यामुळे इतर उद्योगाप्रमाणे शेतीचेही अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले.

युवा शेतकऱ्यांनी साधली संकटातील संधी   

सध्याच्या स्थितीला राज्यात बहुतांश शेतकरी हा युवा आहे त्यामुळे त्यांना या संकटातही एक नामी संधी उपलब्ध झाली आणि काही सामाजिक संस्था व कृषी खाते यांच्या मदतीने पिकविणारा शेतकरी विक्रेता झाला. राज्यातल्या बहुतांश भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीला भाजीपाला, केळी, फुले, फळे यासारखी उत्पादने लॉकडाऊन मुळे व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे गावातच पडून होती.( कालांतराने यात कृषीमाल वाहतुकीला परवानगी मिळाली पण व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली.) त्यानंतर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली काही युवा शेतकरी पुढे सरसावत लगतच्या शहरात आपल्या मालासह दाखल झाले आणि सर्व कायदेशीररीत्या नियम पाळून विक्री करू लागले.


लॉकडाऊनच्या बंदीलाच केले संधी…..

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा शेतकऱ्यांसाठी बंदी नाही तर संधी म्हणून लाभला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनमध्ये शेतमाल विकीचे तंत्र शेतकरी शिकला. या सर्व घडामोडीत एक आदर्शवत असे मॉडेल जळगांव येथील आत्मा व कृषी विभाग यांनी तयार केले. सर्व तालुका स्तरावर असलेली यंत्रणा सोशिअल मिडियाच्या माध्यमातून एकत्र करून कृषी विभागाने शेतमाल विक्री बाबत जनजागृती केली. आवश्यक असलेले सर्व परवाने तत्काळ उपलब्ध करून दिले आणि शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना विकायला उत्स्फूर्त केले.

शेतकरी ते ग्राहक संकल्पना
         लॉकडाऊनच्या काळात नागरीकांना जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला व फळे यांची कमतरता भासू नये अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि त्याच्या सोबत जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार आणि संपूर्ण कृषी विभागाची यंत्रणा कार्यरत झाली. मग जिल्ह्यातील नागरीकांना भाजीपाला व फळे थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागाने केले. कृषि विभागामार्फत शेतकरी, शेतकरी गट, आत्मा गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केली. भाजी मंडईमध्ये गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना सुरक्षितपणे आपला भाजीपाला विकता यावा, यादृष्टीने कृषी विभागाने शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. याकरीता शेतकरी गटांशी चर्चा करुन शेतातील भाजीपाला, फळे ग्राहकाच्या दारापर्यंत देण्याचे निश्चित करण्यात आले.

कोकणातील शेतमाल जिल्ह्यात

इतर शेतीमालाप्रमाणे काहीशी परिस्थिती ही कोकणच्या हापूस आंब्याची झाली. प्रमुख बाजारपेठ व निर्यातदार नसल्याने सर्व माल पडून होता त्यावेळी कृषी विभाग जळगांव यांनी कोकणातील कृषी विभाग व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्यातील अॅग्रोवर्ल्ड या सारख्या संस्थाना सोबत घेत “शेतकरी ते ग्राहक संकल्पना’ प्रत्यक्षात आणली. अॅग्रोवर्ल्ड व कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी थेट कोकणातील देवगड येथील हापूस आंबा जळगांव मधील ग्राहकांना उपलब्ध करून दिला. सर्व सोशल डिस्टसिंग पाळून आजपर्यंत 1600 डझन अस्सल व नैसर्गिक पिकवलेल्या देवगड हापूसची विक्री करण्यात आली आणि एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. याच प्रकारे कृषी खात्याने जनजागृती करून जिल्ह्यातील शेतमाल हा थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन देत त्यांना सर्व परवानगी देत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना विक्रेते होण्यास मदत केली. बघता बघता 27 मार्चपासून आजपर्यंत 883 गटांच्या व उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 31 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने शेतक-यांना मोठे सहाय्य मिळाले. तर जनतेलाही घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.

दालन सोडून कृषि उपसंचालकांची मैदानात उडी……

आजपर्यंत जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकून स्वतःही पैसे मिळविले आणि ग्राहकांना देखील कमी किंमतीत शेतमाला उपलब्ध झाला. या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  14 कोटी 25 लाख रुपयांची 9500 क्विंटल फळे तर  16 कोटी 75 लाख रुपयांचा 7500 क्विंटल भाजीपाला विक्री केला आहे. कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना संपर्क करून शेतमाल विक्रीसाठी प्रवृत्त करीत ही शेतकऱ्यांना एक आदर्शवत असे मॉडेल तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. कार्यालया ऐवजी शेतीच्या बांधावर रमणारे कृषी उपसंचालक अनिल भोकरे कोरोनाच्या संकटात देखील कार्यालय सोडून मैदानात उतरले. शिरसोली येथील शेतकरी चंद्रशेखर झुरकाळे यांनी कांदा, उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी टरबूज, पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी खरबुज, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी विनोद तराळ यांनी केळी, तर आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील, म्हसावद येथील शैलेंद्र चव्हाण यांनी कलर शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी विक्रीत महत्वाचा वाटा उचलला. या शेतकर्यांनी उचलेले पहिले पाउल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

लॉकडाऊनच्या काळात उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी 12 लाख रुपयांच्या  टरबूजांची विक्री केली तर पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी 45 लाख रुपयांची मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी 40 लाख रुपयांच्या खरबुज विक्री केल्याने लॉकडाऊन हे आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून उपलब्ध झाल्याचे या शेतकऱ्यांना वाटते. याचप्रमाणे आव्हाने येथील समाधान पाटील, म्हसावद येथील शैलेन्द्र चव्हाण यांची सिमला मिरची व यासारख्या इतरही अनेक लहान मोठ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून विक्री परवानगी मिळवत आपला शेतमाल या संकटातही शहरवासीयांना उपलब्ध करून देत स्वतःलाही या संकटात काही अंशी सावरले आहे.
भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली असून कोरोना संसर्गापासून सरंक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल विक्री करताना तसेच तालुक्यातून गावात येत असताना काय दक्षता घ्यावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभागी शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्याही सुचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या होत्या. एकूण लॉकडाऊन च्या तीन चरणाचा अनुभव पाहता आता असे म्हणता येईल “ मेरा किसान बदल रहा हैI”

आता पुढे काय?
शेतकरी हा नेहमी व्यापाऱ्यांच्या हातातील बाहुले राहिला आहे. नेहमी बाजार समिती व व्यापारी यांच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीच्या संकल्पनेने एक नवीन आत्मविश्वास मिळाला असून यानंतरही कृषी विभागाच्या सहकायाने याच पद्धतीने शेतीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या सुपरहिरोजचा असणार आहे. त्यासाठी अजून काही नवीन प्रोजेक्टवर विभागाचे काम सुरु आहे.

शेतमाल विकीचे तंत्र शिकलो
कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतमाल विकीचे तंत्र शिकलो. अशी उत्सफुर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील मोसंबी उत्पादक शेतकरी शरद पाटील यांनी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागला आणि देशभरात लॉकडाऊन घोषित आला. हा काळ नेमका फळपिकांचा काढणीचा काळ असल्याने हवालदिल झालो होतो. वर्षभर जपलेले पीक मातीमोल होणार या भितीने अंगावर काटाच आला होता. परंतु कृषि विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी ते ग्राहक या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात 45 लाख रुपयांची 150 टन मोसंबी थेट ग्राहकांना विकता आल्याने होणारे नुकसान तर टळलेच शिवाय ग्राहकांनाही माफक दरात ताजी फळे देता आल्याचे समाधान मिळाले.
शरद पाटील  पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव

बंदी नाही संधी …..

लॉकडाऊनच्या काळात नागरीकांना जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला व फळे यांची कमतरता भासू नये अशा सुचना  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन  जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आणि मग जिल्ह्यातील नागरीकांना भाजीपाला व फळे थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागाने केले. याकरीता शेतकरी गटांशी चर्चा करुन शेतातील भाजीपाला, फळे ग्राहकाच्या दारापर्यंत देण्याचे निश्चित करण्यात आले. आणि बघता बघता 27 मार्चपासून तिसरा लॉकडाऊन संपेपर्यंत 883 गटांच्या व उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 31 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने शेतक-यांना मोठे सहाय्य मिळाले. तर जनतेलाही घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला
संभाजी ठाकूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , जळगांव

या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  14 कोटी 25 लाख रुपयांची 9500 क्विंटल फळे तर  16 कोटी 75 लाख रुपयांचा 7500 क्विंटल भाजीपाला विक्री केला आहे. यामध्ये जिह्यातील विविध शेतकऱ्यांचा कांदा, टरबूज, मोसंबी, खरबुज, केळी, कलर शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी, आंबा विक्रीत महत्वाचा वाटा आहे. शेतकरी आता विक्रीचे तंत्र शिकला आहे यापुढेही कृषी विभागाच्या माध्यामतून हि साखळी अशीच पुढे सुरु ठेवण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल.
अनिल भोकरे  कृषि उपसंचालक , जळगांव

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमातून शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्राहकांना थेट त्यांच्या दारात भाजीपाला व फळे पुरवली जात असल्यानें ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच मालाची विक्री करताना ग्राहकांशी होणारी चर्चा यामधून आम्ही आमचा शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत केले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात अनेक शेतकरी रोज नव्याने सहभागी होत आहे. शेतमाल विकताना गर्दी होऊ नये व फळे भाजीपाला घरपोच मिळावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची ठिकाणे ठरवून देण्यात आली त्या दृष्टिकोनातून काटेकोर नियोजन केले
संजय पवार आत्मा प्रकल्प उपसंचालक, जळगांव

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आत्मा प्रकल्पकृषि उपसंचालककोरोनाजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीलॉकडाऊन
Previous Post

गहू लागवड तंत्रज्ञान

Next Post

रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

Next Post
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

Comments 1

  1. राजेंद्र पंडित भोकरे says:
    5 years ago

    खरोखर चव्हाण साहेब कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे शेतकरी उत्पादकांना दिलासा दिला आहे या योध्दांचे खुप कौतुक केले पाहिजे

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish