बैलपोळा हा शेतकरी बांधवांचा आपल्या सर्जा-राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. हा दिवस श्रावण अमवस्येला असतो. हा दिवस अजून एका कारणासाठी महत्वाचा आहे, तो म्हणजे या काळात पिकांवर निर्माण होणारी किडी. महाराष्ट्रात यावर्षी मृग नक्षत्रातच पेरण्या झाल्या, अगदी वेळेवर कापसाची लागवड झाल्यामुळे, आणि वेळेवर पाऊस पडत असल्यामुळे कापसाचे पीक अतिउत्तम स्थितीत आहे. ह्या वर्षी कापसावर रसशोषक किडही कमी आहे, त्यामुळे कीडनाशक फवारणीची जास्त आवश्यकता भासली नाही, परंतु आपल्या जुन्या शेतकऱ्यांच्या निरीक्षणानुसार सर्वात जास्त किडींचा प्रादुर्भाव हा अमावस्या या वेळी असतो असे निरीक्षण नोंदविले आहे.
किडींचा प्रादुर्भाव हा अमावस्यानंतरच का ?
कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावस्या, किडींच्या मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावस्या एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या ४/५ काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, ही अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर, पातीच्या देठावर घालतात, ही अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात
उपाय
अमावस्येच्या २ दिवसांनी म्हणजेच २१ ऑगस्ट नंतर २४ ऑगस्ट पर्यंत खालील फवारणी करावी. प्रमाण १५ लिटरच्या पंपासाठी आहे.
निमतेल किंवा नीम अर्क 40 मिली
सिलिकॉन स्टिकर 5 मिली प्रोफेनोफोस+सापरमेथ्रीन 40 मिली,
कारबेनडीझम 40 ग्रॅम(बुरशीनाशक)
किंवा
निंमतेल किँवा निंबोळी अर्क 40 मिली
सिलिकॉन स्टिकर 5 मिली
प्रोफेनोफोस(प्लेन) 40 मिली
फायटर 15 मिली
कारबेंडिझम 40 ग्रॅम (बुरशीनाशक)
वरील दोन पैकी कोणतीही एकच फवारणी करावी. निमयुक्त औषध आणि प्रोफेनोफोस हे अंडीनाशक व बारीक अळी मारण्याचे काम करते
वरील फवारणीचा परिणाम
प्रोफेनोफॉस अळी व अंडी नाशक असल्यामुळे प्राथमिक अवस्थेतील अळी मरेल अंडी नासल्यामुळे अळी अंड्यातून बाहेर येणार नाही. नीम अर्कात ऍझोडीरेकटींन हा घटक अंडी नाशक आहे, अंडी नासतील , नीम अर्काचा तीव्र कडू गंधामूळे पतंग आपल्या शेतात अंडी घालणार नाहीत, भुकेने व्याकुळ होऊन अळी मरेल.
अमावस्ये नंतर हे 2 फवारे मारल्या नंतर 15/20 दिवस फवारणी करावी लागणार नाही, पण तो पर्यंत पुढची आमावस्या येईल, मग पुन्हा वरील प्रमाणेच करावे लागेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या दोन्ही आमावस्या सांभाळल्या तर नक्कीच आपल्या उत्पादनात भर पडेल.
सौजन्य:- समाज माध्यम, अंतरजाल