अ .लाभार्थी पात्रता-
1) शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक.
2) जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
3) 7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
4) ज्या शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य व त्यानंतर अन्य शेतकरी यांचा विचार करण्यात येइल (कुटुंबाची व्याख्या- पती पत्नी व अज्ञान मुले).
ब. क्षेत्र मर्यादा-
किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हे. पर्यंत लाभ घेता येइल.
क. अनुदान मर्यादा –
100 टक्के.
अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळनार.
प्रथम वर्षी 50 टक्के, दुसरे वर्षी- 30 टक्के, व तीसरे वर्षी- 20 टक्के.
ड. अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी.
इ. लागवड कालावधी-
जून ते मार्च.
शेतकरी यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येइल.
शेतकरी याना फळबाग लागवडी साठी कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रिय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकेतून कलमे रोपे खरेदी करता येतिल.
तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी फळबाग लागवड करावी.
ई ) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर-
आंबा कलमे (10×10 मी)- 53900 रु.
आंबा कलमे(5×5 मी)- 102530 रु.
पेरु कलमे (6×6 मी)- 62472 रु.
सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी)- 62578 रु.
सिताफळ कलमे(5x 5 मी)-72798 रु.
चिकू कलमे- 52355 रु.
डाळिंब कलमे(4.5×3 मी)- 107783 रु.
फ) अधिक माहिती साठी-
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मार्गदर्शक सूचना
सौजन्य :- कृषी विभाग महाराष्ट्र शासन