रब्बीच्या पिकांनाही बसू शकतो फटका: बळीराजाच्या चिंतेत वाढ
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ सदृश परीस्थिती निर्माण होऊन राज्यात तुरळक ठिकाण पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे तापमानात वाढ होऊ शकते.
या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू व दक्षिण कर्नाटक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, जळगांव, सोलापूर कोल्हापूर येथील वातावरणात लक्षणीय बदल होऊन तापमानात वाढ झाली आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर या कालवधीसाठी हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यानंतर मात्र राज्यात हवामान कोरडे राहील.
यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हंगामा हातचा गेलेला असतांनाच त्यात आता सर्व भिस्त ही रब्बीच्या पिकांवर असल्यामुळे या हवामानाच्या अंदाजाने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या कालावधीत जर पाऊस झाला तर राज्यात काही ठिकाणी दादर, हरभरा व इतर पिकांची लागवड झाली आहे त्याला या पावसाचा फटका बसू शकतो. त्यासह फुलात असणाऱ्या तूर पिकालासुद्धा यामुळे फटका बसू शकतो. राज्यात रविवारी सकाळी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे त्यामुळे या चिंतेत अजून भर पडली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जर शेतात काही ठिकाणी जनावरांचा चारा किंवा काही शेतमाल असेल तर तो वेळेत संरक्षित ठिकाणी ठेवावा व संभाव्य नुकसान टाळावी.














