प्रदर्शनाचा समारोप; चार दिवसांत सव्वा लाखावर शेतकऱ्यांच्या भेटी
जळगाव, ता. १८ (प्रतिनिधी)ः
अॅग्रोवर्ल्डच्या माध्यामातून लाखो शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान मिळाले. शेतकऱ्यांची अवस्था आज आकाश फाटल्यागत झाली आहे, परंतु या फाटलेल्या आकाशाला मी सुद्धा एक टाका मारेल असा असा विश्वास या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यावर मिळतो, असे भावोद्गार समारोपाचे अध्यक्ष आ.सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
अॅग्रोवर्ल्ड कृषी व दुग्ध प्रदर्शनाचा समारोप काल (सोमवारी) आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कृषिभूषण विश्वासराव पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक अशोक गुप्ता, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी व्यासपीठावर विकास अधिकारी मधुकर चौधरी, प्लांन्टो कृषीतंत्रचे निखिल चौधरी, पोकराचे संजय पवार, कावेरी राजपूत तंत्र अधिकारी कृषी विभाग जळगांव, धनंजय राजपूत वनविभाग चाळीसगाव व अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅग्रोवर्ल्डचे उपसंपादक प्रविण देवरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनात चार दिवसांत सव्वा लाखावर शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. आ. भोळे यांनी “शेतकरी ते ग्राहक विक्री” साठी जळगांवमध्ये बळीराजा मार्केट सुरु करणार असल्याची घोषणा अॅग्रोवर्ल्डच्या मंचावरून केली.
पुरस्कार्थी कंपनी प्रतिनिधी –
सुशील पाटील (रेव्वूलीस), घनश्याम पाटील(नाथ बायोसीड), अनिल राजपूत(इंबी जलसंचय), जिवराज अमले (VST), किशोर कोलते(BCS), देविदास शिंदे(एलोरा सिड), सुनील शिंदे(कावेरी सिड) संजीव पाटील(इफको), राहुल नांदले(टेक्स्मो), बि.डी.जडे(जैन इरिगेशन सिस्टीम ली. वरिष्ठ कृषी तज्ज्ञ), गोपाल पाटील(राशी सीड्स) कल्याणसिंग कोमलसिंग पाटील(पितांबरी), मनोज पाटील (रेवा फ्लोरा), विजय बाळकृष्ण इंगळे(इंगळे हायटेक नर्सरी), दीपक राजपूत(श्री समर्थ कृपा डिजिटल प्रिंटर्स), महेश घारगे (शब्दरंगसंवाद) हनुमानजी प्रजापत(शुभ एन्टरप्राइजेस), धीरज दलाल (शुभमंगल डेकोरेटर & केटरर्स), धवल मेहता.