क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे.
केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे. म्हणून जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते.
मुख्यतः उत्तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते.
त्याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.
केळीच्या 86 टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो.
पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात.
फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात.
वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो.
केळीमध्ये कर्बयुक्त पदार्थचा भरपूर साठा असून 18 ते 20 टक्के शर्करी, स्निग्ध पदार्थ, कॅलशिअम फॉस्पोरस, लोह खनिजे, ब जीवनसत्व यांचा आंतरभाव असतो. कच्या फळात टॅनीन व स्टार्च विपूल प्रमाणात असते. केळी पिकापासून 79 कॅलरीपर्यंत उष्णता मिळू शकते.केळीचे फळ मधूमेह, संधीवात मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्यादींवर गुणकारी आहे.
केळी हे उष्ण कटीबंधीय फळ असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्त उष्ण हवामान असल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्त झाल्यास केळीची वाढ खुंटते. उन्हाळयातील उष्ण वारे व हिवाळयातील कडाक्याची थंडी या पिकाला हानीकारक असते.
जळगांव जिल्हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्त क्षेत्र असण्याचे कारण म्हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय व उत्तर भारतातील बाजारपेठांशी सुलभ, थेट दळणवळण हे होय.
केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते. क्षारयुक्त जमिनी मात्र केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
- दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
- अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
- ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
- परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा.
- केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
- केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
- जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
- केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
- रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
- अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
- महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.
- रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो.
- केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
- केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो.
- सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.