विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार डबल लाभ !
महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील खरीपातील हाताशी आलेल्या शेतमालाचे नुकसान झालेले आहे. त्यातच या कालखंडात विधानसभा निवडणूक आणि दिवाळीच्या सलग सुट्या आल्यामुळे सरकारी यंत्रणा वेगळ्या कामात असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे व पंचनाम्याकडे दुर्लक्ष झाले होते.
२४ तासात द्यावी लागणार विमा कंपनीला माहिती
दिवाळी संपली तरी भाऊबीजेला बऱ्याच भागात पुन्हा मुसळधार व गारांच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे अजून अडचणीत भर पडली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला पंचनाम्याचे आदेश दिले आहे. परंतु कामाचा व्याप आणि नुकसानग्रस्त क्षेत्र पाहता या प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे त्यांनी नुकसान झाल्याच्या २४ तासात संबंधित विमा कंपनीला नुकसानी बाबतची माहिती द्यायची आहे. माहिती दिल्यानंतर उर्वरित माहिती ७ दिवसात दिली तरी चालणार आहे. अशा शेतकऱ्यांना विमा कंपनी व सरकार अशा दोन्ही ठिकाणाहून मदत मिळू शकते.
अतिवृष्टीने मका, सोयाबीन, कापूस व इतर परिपक्व पिकांना कोंब आलेत. त्यामुळे कापणी केलेल्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसार्गीक आपत्ती व काढणी पाश्च्यात नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश आहेत. शेतात कापून ठेवलेल्या पिकांचे १५ दिवसाच्या आत वादळी पावसाने नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद यात आहे. परंतु शेतकऱ्यांनी पंचनाम्याचे अर्ज व माहिती २४ तासात संबंधी विमा कंपनीला दिल्यानंतर पिकांची नुकसान भरपाई देणे संबंधित विमाकंपनीला बंधनकारक आहे. शासनातर्फे जरी पंचनामे होणार असले तरी पीकविमा धारक शेतकऱ्यांनी [email protected] , [email protected] या वेबसाईटवर २४ तासात माहिती दिली तरी अश्या शेतकऱ्यांना डबल नुकसानभरपाई मिळू शकते. बुधवार पासून शासकीय पंचनामे सुरु होणार आहे. तरी वरीलप्रमाणे माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला द्यावी.