• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अवर्षणग्रस्त भागात फळबाग जोपासली

Team Agroworld by Team Agroworld
September 7, 2019
in यशोगाथा
0
अवर्षणग्रस्त भागात फळबाग जोपासली
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

केदार बंधूचे प्रयोग, सहा एकरात 7 लाखाचे उत्पन्न

केदार बंधूंच्या शेतीची वैशिष्ट्ये
* नोकरी सांभाळूनही शेतीची जबाबदारी सांभाळली.
* सेंद्रिय पद्धतीवर दिला अधिक भर
* दुष्काळातही सातत्याने प्रयोगशीलता जपली
* सिंचन व्यवस्था बळकट केली
* पडीक जमिनीवर डाळिंब लागवडीचे नियोजन

नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्याातील सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ याने जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी चे शिक्षण घेतलेले आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित 42 एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत. प्रतिकूल परिस्थितीतही केदार बंधूंनी प्रयोगशीलता जपली.
दोन एकरात केळी उत्पादन
केदार परिवाराने वर्ष 2000 मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापार्‍यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले. त्यांनी सन 1996-97 मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या फळाला डझनाला तीस ते चाळीस रुपये तर लहान नगाला वीस ते तीस रुपयेपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता. त्यांनी 2013 मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला. त्यामुळे केदार परिवार या भागात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत.
गाळ टाकून आंबा लागवड
केदार बंधूंना फळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरांची मोठी समस्या होती. यावर उपाय म्हणून अखेर पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुटूंबातील सर्वांच्या संमतीने नियोजन करून 2006 मध्ये आंबा लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून टाकली व लागवड केली. खते, पाणी आणि अन्य नियोजनातून उत्पादनात वाढ केली. आज मितीला त्यांच्याकडे सहा एकर क्षेत्रात 320 केशर, 15 तोतापुरी, 60 हापुस, 15 सदाबहार झाडे आहेत. सदाहबार हे कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीच्या उपयोगीचा आंबा आहे. आंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे 30 ते 35 झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसर्‍या वर्षी 40 झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. गेल्यावर्षी 250 ते 300 झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली राहिली. केशर व हापूसला आत्तापर्यंत 70 ते 90 रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा मात्र दुष्काळाचा फटका बसला.
आंबा बागेत आंतरपीक
आंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला.
विहिरीच्या पाण्याचा आधार
पाथर्डी तालुक्याातील बहुतांश भागात पाणीटंचाई सातत्याने असते. दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळण्यासाठी झालेल्या पाझर तलावाचा सैदापूर-सात्रळसह परिसराला आधार आहे. केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणार्‍या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे. शिवाय केदार यांनी 2011 मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. 2013 -14 मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली. यंदाही विकतच्या पाण्यावर झाडे जगवावी लागली असली तरी शेततळ्याचा काही प्रमाणात आधार मिळाला. वर्ष 2000 पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा त्यांचा मानस आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
आंबा बागेत सुरवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत जैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवण क्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे.


अवर्षणग्रस्त भागात शेतीसाठी शर्थीचे प्रयत्न
पाथर्डी तालुक्यात कायम दुष्काळ आहे. हा भाग अवर्षणग्रस्त असूनही शर्थीचे प्रयत्न केल्याने शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. दर्जेदार उत्पादन घेतल्याने त्याला बाजारपेठ मिळाजली आहे. येत्या काळात कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
– सुभाष केदार
मो.नं.9421822426

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अवर्षणग्रस्त भागआंबा बागकेशरतोतापुरीसेंद्रिय शेतीहापुस
Previous Post

मिश्र फळबागेमुळे शेतीला मिळाली नवी दिशा

Next Post

नागपूरात ऑरेंज अलर्ट : चार तासात विक्रमी ७७.२ मिमी इतका पाऊस

Next Post
नागपूरात ऑरेंज अलर्ट : चार तासात  विक्रमी ७७.२ मिमी इतका पाऊस

नागपूरात ऑरेंज अलर्ट : चार तासात विक्रमी ७७.२ मिमी इतका पाऊस

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish