शेतीचे यांत्रिकीकरण हा विषय एका दशकापूर्वी गौण समजला जात होता. परंतु मागील काही वर्षांत मजुरांची कमतरता तिव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली व यांत्रिकीकरण हा विषय चर्चेत आला. विकसित
देशांमध्ये यांत्रिकीकरण हाच शेतीचा महत्वाचा घटक आहे व त्याशिवाय तिथे शेती अशक्य आहे. हीच परिस्थिती आपल्याकडे हळूह्ळू येत आहे.ही वस्तुस्थिती आता सर्वांच्या लक्षात आली आहे. कृषि
यांत्रिकीकरणामुळे मजुरांची कमतरता भरून काढली जाते.त्याचबरोबर त्याचा मुख्य उद्देश म्हणजे कार्यक्षम वापर, वेळेवर शेती कामाची पूर्तता, उत्पादन खर्चात घट, शेतीतील कष्ट कमी करणे व नैसर्गिक
संसाधनाचे संवर्धन करणे हा होय.
ट्रॅक्टरचलित कापूस पऱ्हाट्या कुट्टी यंत्र :
कापूस कुट्टी यंत्र ट्रॅक्टरचलित असून कापूस वेचणी झाल्यावर कापसाच्या पऱ्हाट्या कुट्टी करण्यासाठी याचा उपयोग होतो.हे यंत्र ट्रॅक्टरच्या मागच्या थ्री पॉईंट लिंकेजला जोडून पी.टि.ओ पॉवरच्या साहाय्याने
चालविले जाते.एका वेळेस कापूस पर्हाट्याची एक ओळ जमिनीपासून ५ से.मी पर्यंत कापून कुट्टी करून ब्लोवर च्या साहाय्याने मागे जमिनीवर टाकली जाते.केलेली कुट्टी गोळा करावयाची असल्यास त्याच
यंत्राला मागच्या बाजूला ट्रॉली जोडून त्यात गोळा करता येते.
वैशिष्ठे :
१. अतिशय सोपे,जलद व कार्यक्षम यंत्र
२. वेळ,श्रम आणि पैशात बचत
३.भाडेतत्वावर अधिक उपयोगी कार्यक्षम यंत्र
४. चार कुट्टी करण्यासाठी सुद्धा वापर करता येतो
ट्रॅक्टरचलित खड्डा करणारे यंत्र
हे एक ट्रॅक्टरचलित खड्डा करणारे यन्र असून याचा उपयोग फळबागेसाठी,वृक्षारोपण किंवा कुंपणाचे खड्डे करण्यासाठी केला जातो.हे यंत्र ट्रॅक्टरच्या थ्री पॉईंट लिंकेजला जोडले जाऊन ट्रॅक्टर पी.टि.ओ च्या
पॉवर ने यंत्राचा खड्डा करणारा स्क्रू चालविला जातो.
ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र:
ह्या यंत्राला बूम फवारणी यंत्र असे म्हणतात.मुग,उरीद, सोयाबीन ,कापूस,हरभरा,आदि पिकांसाठी ह्याचा वापर करता येतो. पिकाप्रमाणे बूम ची उंची सेट करून फवारणी करता येते.एका वेळेस ३०
फुट फवारणी (कव्हरेज) २० नोझलद्वारे करता येते.या मध्ये फुल कोन नोझल व फ्ल्याट नोझल दिले गेले आहेत,ज्याचा उपयोग अनुक्रमे किडनाशक व तणनाशक फवारणीसाठी केला जातो.ट्रक्टरला मागच्या
बाजूला थ्री पोइंट लिंकेज ला जोडला जातो व पी.टी.ओ.च्या सहाय्याने एच.टी.पी. फिरवून दाब तयार केला जातो.ह्या स्पेअर मध्ये मुख्यतः टाकी,पम्प असेम्ब्ली,सक्शन पाईप सोबत स्ट्रेणर,प्रेशर
गेज,रेगुलेटर,एअरचेम्बर,डिलिव्हरी पाईपआणि स्प्रे बूम सोबत नोझल असते.
नोझल संख्या २०
स्प्रे स्व्याथ (कवरेज ) ३० फुट
दोन नोझल मधील आंतर ४५० मिमी.
टाकीची क्षमता ४०० लिटर
बूम उंची ३०० मिमी ते १२६० मिमी (आवश्यकतेनुसार बदलता येते)
क्षमता ८ हेक्टर प्रति दिन (२० नोझल सहित)
ट्रक्टर एच पी. ३५ आणि जास्त
वैशिष्ठे :
१. वेळ श्रम आणि पैशात बचत
२. भाडेतत्वावर अधिक उपयोगी व कार्यक्षम
३. कमी वेळात जास्त फवारणी करता येते.
पॉवर वीडर
लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो. भारतातील शेतीयोग्य जमीनीचे क्षेत्रफळ
जवळपास एकूण जमीनीच्या ५६.७८% एवढे आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील शेतीयोग्य जमीनीचे क्षेत्रफळ सतत घटत आहे. शेतीच्या मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर,
पॉवर टिलर अशी आधुनिक यंत्र सामुग्री जवळपास सर्वच शेतकरी वापरू लागले आहेत. याचबरोबर शेतीमध्ये होणार आं तर मशागतीचा खर्च कमी करावयाचा असेल तर शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठे,केंद्रीय
संस्था,वेगवेगळ्या कम्पन्यां यांची संशोधित स्वयंचलित अवजारे आजकाल बाजारात उपलब्ध आहेत. तसेच मजुरांचा अपुरा पुरवठा यामुळे काही संशोधक शेतकऱ्यांनी अंतर मशागतीचे अवजारे देखील तयार
केले आहेत.शेतामध्ये, बांधावर तसेच रस्त्याकडेला वाढणारे तण ही शेतकऱ्यांपुढील मोठी समस्या आहे. हे वाढलेले तण वेळोवेळी काढणे गरजेचे असते. जेणेकरून पिकातील गवात पिकाशी खत, पाणी ,
सूर्यप्रकाश इ. साठी स्पर्धा करत नाही.कृषी मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने शेतकरी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात; परंतु त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन
परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल. पॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात,उद्यानविद्या आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते. ज्या
पिकांच्या सरींमधील अंतर 60-70 सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इत्यादी विविध
पिकांसाठी आपण पॉवर वीडरचा वापर करू शकतो. विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वकशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत. पॉवर वीडर मध्ये इंजिन , इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन ,
हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल इ. भाग आहेत
1 पॉवर वीडर ची कार्य रुंदी (इंच) 12-39
2 अश्वशक्ती 2-7
3 ब्लड संख्या 8-24
4 इंधन पेट्रोल किंवा डिझेल
5 पॉवर ट्रान्समिशन चेन किंवा बेल्ट द्वारे
6 वजन {कि. ग्रा} 50-60
7 स्टिअरिंग उंची आवश्यकतेनुसार बदलता येते
8 इंधन क्षमता 800 एम.एल ते 1 लिटर /तास
9 कार्य खोली {इंच} 4-6
पॉवर वीडरची वैशिष्ट्ये
• बहुपयोगी,
• वजनाने हलके,
• आकाराने लहान,
• वापरायला सोपे
• उत्कृष्ट कार्यक्षमता,
इंजि. वैभव सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव
मोबाईल नं: ९७३०६९६५५४