राज्यातील शेतकर्यांची बियाण्याची गरज निर्धारित व अनुमानित करून राज्याच्या कृषी आयुक्तालयस्तरावर कृषी विद्यापीठे, महाबीज व कृषी महामंडळाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांत बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. याकरिता संबंधित जिल्ह्यातील त्या पीक वाणाची मागणी, उत्पादकता, शेतकर्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमातील सहभाग, महामंडळाची त्या भागातील बियाणे साठवणूक व प्रक्रियाक्षमता आणि जिल्ह्यातील सर्वसाधारण नैसर्गिक परिस्थिती इ. सर्व बाबींचा विचार करून, पीक/वाणनिहाय बीजोत्पादन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.
बीजोत्पादन कार्यक्रमातील उत्पादित बियाण्याचे खेरदी धोरण प्रत्येक हंगामापूर्वीच महामंडळाद्वारे जाहीर करण्यात येत असल्यामुळे दरवर्षी शेतकर्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमामधील सहभाग वाढत आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची धोरणे, नियम व अटींमध्ये पूर्ण पारदर्शकता असल्यामुळे सध्या राज्यातील 2,16,480 एकर क्षेत्रावर 34,163 बीजोत्पादक शेतकर्यांमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
बीजोत्पादनामधील सहभागमुळे राज्यातील बीजोत्पादक शेतकर्यांना 20 ते 25 टक्के अधिक आर्थिक लाभ मिळत असल्यामुळे बीजोत्पादकांनी केलेल्या विविध पीक वाणांच्या उत्पादनामुळे राज्यातील शेतक-यांना प्रमाणित बियाणे रास्तदरात उपलब्ध होत आहे व त्यामुळे बियाणे बदल कार्यक्रम यशस्वी होऊन एकूण उत्पादकता व उत्पादनात वाढ झालेली आहे. महामंडळामार्फत वर्षनिहाय बियाणे उत्पादन व उपलब्धतेचा तपशील पुढील पानावरील तक्त्यात दर्शविला आहे.
बीजोत्पादन कार्यकमांतर्गत बियाणे खरेदी धोरण
जिल्हानिहाय निवडक कृषि उत्पन्न बाजार समितीमधील पिकनिहाय पूर्वघोषित कालावधीतील दररोजच्या उच्चतम दराचा सरासरी दर अधिक पिकनिहाय 20 ते 25 टक्के प्रोत्साहनपर स्कम. अधिक पिकनिहाय कमीतकमी निम्नस्तर (लो ग्रेड) बियाणे आधारित रु. 50 ते रु. 125 प्रति क्रि, विशेष प्रोत्साहनपर रकम अधिक पिकनिहाय जास्तीत जास्त उगवणशक्ती आधारित रु. 75 ते रु. 125 प्रति क्कि, विशेष प्रोत्साहनपर रक्कम. याव्यतिरिक्त शासनाकडून योजनानिहाय बीजोत्पादन अनुदान प्राप्त झाल्यास, सदरचे सम प्रमाणात वितरण तथा महामंडळास योग्य नफा झाल्यास त्यामधून बोनसचे वितरण.
ग्राम बीजोत्पादन वाढीसाठी विशेष प्रोत्साहन योजनेची वैशिष्ट्ये-
अ) एका गावात 201 हेक्टरपेक्षा जास्त बीजोत्पादन क्षेत्र असल्यास 100 टक्के तपासणी शुल्क परतावा. एका गावात 151 ते 200 हेक्टर बीजोत्पादन क्षेत्र असल्यास 75 टक्के तपासणी शुल्क परतावा. एका गावात 101 ते 150 हेक्टर बीजोत्पादन क्षेत्र असल्यास 50 टक्के तपासणी शुल्क परतावा. ब) एका गावातून 5,000 किंटलपेक्षा जास्त प्रमाणित बियाणे उत्पादन असल्यास प्रति गाव रु. 21,000/- प्रोत्साहनपर बक्षीस. एका गावातून 3000 किंटलपेक्षा जास्त प्रमाणित बियाणे उत्पादन असल्यास प्रत्येक गाव रु. 15,000/- प्रोत्साहनपर बक्षीस. क) रब्बी हंगामासाठी एका गावात 125 हेक्टरवर 50 टक्के व 75 ते 124 हेक्टरसाठी प्रतिगावाकरिता 25 टक्के तपासणी शुल्क परतावा.
राज्यातच कडधान्य बियाणे उत्पादित करण्यावर भर राज्यातील कडधान्य उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कडधान्यांच्या विविध वाणांचे बियाणे राज्यातच उत्पादित करण्यावर भर देण्यात येतो व त्यानुसार मूग, उडीद, तूर आणि हरभरा पीक वाणाचे प्रमाणित बियाणे राज्यातील बीजोत्पादकामार्फत उत्पादित करुन व कमी पडत असलेले बियाणे इतर राज्यांत रब्बी हंगामात उत्पादित करून, विविध केंद्र पुरस्कृत योजनांमार्फत शेतकर्यांना पुरवठा करण्यात येते. महामंडळामार्फत मागील दहा वर्षांमधील कडधान्य पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन 66,000 क्विंटल वरून 1,31,000 क्विंटलपर्यंत वाढविण्यात आलेले आहे.
याव्यतिरिक्त प्रतिकूल हवामानामुळे ज्या पीक व वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम राज्यात कमी होतो तसेच काही पीक वाणांच्या बीजोत्पादनासाठी राज्यात असलेल्या अडचणी विचारात घेऊन महामंडळाने प्रयत्नपूर्वक बाह्य राज्यातील जास्त उत्पादकता व माफक बियाणे खरेदीदर असलेले निवडक क्षेत्र निश्चित केलेले असून, अशा क्षेत्रात ठरविक पीक वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन तेथील उत्पादित बियाणे वाजवी दरात शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येते.
विपणन व्यवस्था
महामंडळाद्वारे बियाणे व विपणन कार्यात निपुण अशा 1,362 अधिकृत महाबीज विक्रेत्यांचे जाळे राज्यामध्ये सर्वदूर पसरलेले असून, रास्तदरात व निर्धारित वेळेमध्ये गरजेएवढे बियाणे शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिके, शेती कार्यशाळा, शेतीदिन इत्यादींद्वारे शेतक-यांना प्रशिक्षित करण्याकरिता विस्तार कार्याचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. विक्रेत्यांनासुद्धा वेळेत बियाणे पुरवठा, विक्रीपश्चात सेवा व विस्तार इत्यादींचे पाठबळ देऊन, बियाणे, विक्रीवर माफक सूट व सवलती देण्यात येतात. महामंडळाद्वारे राज्य सरकारच्या बियाणे पुरवठाविषयक योजनांमध्ये प्राधान्याने बियाणे पुरवठा करून, शासकीय योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यात येतो. याव्यतिरिक्त शिक्षक बियाण्याचे महाराष्ट्र राज्याबाहेर विपणनाचे कार्य देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक व आंध्र प्रदेश या इतर राज्यांतसुद्धा करण्यात येत आहे.