शासकीय योजना

कापूस श्रेडर यंत्रावर 40 ते 50 टक्के अनुदान; अर्ज कुठे आणि कसा कराल?

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेली ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. याचे संपूर्ण नाव आहे – केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान / कापूस कांती योजना.

योजना का आणली?

कापूस काढणीनंतर शेतात राहणाऱ्या काड्या (पराट्या) अत्यंत कडक असतात. त्या काढण्यासाठी मजुरांवर 6 ते 8 हजार रुपये खर्च येतो. अनेक शेतकरी त्या जाळून टाकतात, त्यामुळे मातीतील उपयुक्त जिवाणू मरतात आणि प्रदूषण होते. कापूस श्रेडर / श्रेडर कम मल्चर हे यंत्र ट्रॅक्टरला जोडून या काड्या जागेवरच बारीक तुकडे करून जमिनीत मिसळते. त्यामुळे,
– शेत 2 दिवसात पुढील पिकासाठी तयार होते
– सेंद्रिय कर्ब वाढतो
– गुलाबी बोंडअळीचे प्रमाण कमी होते
– जाळण्याची गरज नाही

योजनेत काय मिळणार?

राज्यातील 19 कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी एकूण 2,354 यंत्रांना अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 94.93 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे.

 

अनुदानाची रक्कम

– एससी/एसटी प्रवर्ग: यंत्राच्या किमतीच्या 50% किंवा कमाल 71,000 रुपये, जे कमी असेल ते

– सर्वसाधारण / इतर प्रवर्ग, महिला, अल्पभूधारक: किमतीच्या 40% किंवा कमाल 60,000 रुपये

> एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. यंत्राची निवड शेतकऱ्यालाच करायची आहे, पण ते अधिकृत विक्रेत्याकडून आणि मान्यताप्राप्त कंपनीचे असावे.

कोणत्या जिल्ह्यात लाभ मिळेल?

अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

लाभार्थी पात्रता

– महाराष्ट्राचा रहिवासी आणि त्या 19 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यातील असावा
– स्वतःच्या नावे 7/12 असावा
– वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट (10 पेक्षा जास्त सदस्य), एफपीओ, आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था पात्र
– यापूर्वी याच घटकासाठी 5 वर्षात अनुदान घेतलेले नसावे

आवश्यक कागदपत्रे

1. 7/12 आणि 8-अ
2. आधार कार्ड
3. बँक पासबुक (डीबीटी साठी आधार लिंक असलेले खाते)
4. जात प्रमाणपत्र (एससी/एस्टी असल्यास)
5. हमीपत्र

महाडीबीटीवर अर्ज कसा करायचा?

संकेतस्थळ: http://mahadbt.maharashtra.gov.in

1. फार्मर स्कीम1 वर क्लिक करा आणि आपल्या आधारने लॉगिन करा
2. अर्ज करा मध्ये जाऊन कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडा
3. त्यात कापूस उत्पादकता अभियान – स्थानिक पुढाकार – कापूस श्रेडर यंत्र हा घटक निवडा
4. माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा आणि फी (23.60 रु.) भरून अर्ज सबमिट करा
5. अर्जाची प्रिंट आणि पोहोच पावती जपून ठेवा

निवड कशी होणार?
तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयातून अर्जांची छाननी होईल. योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) हे तत्त्व असल्याने लवकर अर्ज करणे फायदेशीर ठरेल. निवड झाल्यावर तुम्हाला एसएमएस येईल, त्यानंतर यंत्र खरेदी करून बिल अपलोड केल्यावर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

शंका असल्यास आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button