• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
in हवामान अंदाज
0
थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, झारखंड आणि ओडिशातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडीचा अंदाज आहे. नागरिकांना उबदार राहण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगितले गेले आहे. उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाल्याने महाराष्ट्रातही थंडीचे आगमन झाले आहे.

 

 

 

राज्यातील रात्रीच्या तापमानात 4 ते 6 अंश घट
महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निवळल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील वाऱ्याची उपस्थिती राज्यात हिवाळ्याची भावना निर्माण करत आहे. गेल्या 4-5 दिवसातच राज्यातील रात्रीच्या तापमानात सुमारे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. आता उर्वरित नोव्हेंबरमध्ये राज्यात पावसाची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 15 ते 18 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबईतही तापमानाचा पारा 20 अंशांखाली घसरला आहे.

 

थंडीची लाट: नारंगी भागात अतिशय तीव्र कडाक्याची, पिवळ्या भागात कडाक्याची

उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
यापुढे राज्यात आकाश स्वच्छ आणि कमी आर्द्रता राहील. उत्तर-मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा सुमारे 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी राहील. जळगावमध्ये कमाल तापमानात 2.7 अंशांची घट होऊन ते 30.8 अंश सेल्सिअस राहिले, तर किमान तापमान पाच अंशांनी खालावून 10° अशा थंडीच्या हवामानाची नोंद झाली. धुळ्यात राज्यातील सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आठवडाभर तापमानाचा पारा आणखी 2 ते 4 अंशाने खालावलेला राहणार आहे. विदर्भातही दिवसासह रात्रीचे तापमान कमी राहील. बदलत्या हवामानात सर्दी, खोकल्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

ला-निना” वर्षांत जणू प्रशांत महासागरातील एअर कंडीशनचे थंड वारे भारताकडे अधिक वेगाने प्रवाहित होतात!
* एल-निनो वर्षांत ते भारतापासून दूर उलट्या दिशेने वाहतात. त्यामुळे ला-निना वर्षांत चांगला पाऊस आणि थंडी असते, तर एल-निनो वर्षात उष्ण हवामान व दुष्काळी स्थिती असते.

 

 

 

बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली
21-22 नोव्हेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर एक तीव्र तीव्र कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढे चेन्नई आणि पुडुचेरीसह उत्तर तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

 

• ला-नीना यंदा परत आला आहे! नोव्हेंबर ते जानेवारी या काळात उत्तर भारतात अधिक कडाक्याची थंडी राहू शकेल. त्याचा परिणाम उर्वरित भारतातील मैदानी प्रदेशावरही जाणवेल. यंदाचा हिवाळा पावसाळ्यासारखाच प्रदीर्घ आणि विक्रमी असेल.

 

 

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू
  • उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish