धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी इथल्या शिवाजी राजपूत यांची भन्नाट सक्सेस स्टोरी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. शून्यातून सुरुवात करून मेहनत, नवे प्रयोग आणि धाडस यांच्या जोरावर त्यांनी कोट्याधीश शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. शिवाजी राजपूत यांनी अगदी साध्या परिस्थितीत, पारंपारिक शेतीतून काहीही मिळत नव्हते, म्हणून 25 एकरावर बांबूची शेती सुरू केली. आता ते वर्षाला तब्बल 25 लाख रुपये कमावतात.
सुरुवातीला पारंपारिक शेतीतून फारसे काही हाती लागत नव्हते. पाऊस, वारे, आणि हवामान बदलामुळे नुकसान व्हायचं. मग राजपूत यांनी 25 एकरावर बांबूची शाश्वत लागवड सुरू केली. 19 वेगवेगळ्या जातींचा अभ्यास करून बांबू लावला. आता ते बांबूच्या खोड, पाने, पावडरपासून नवनवीन उत्पादने तयार करतात. पर्यावरण संवर्धनातही मोठे योगदान देतात. सुरुवातीला राजपूत यांनी स्वतः अभ्यास केला, बांबू मिशन, कृषी विभाग, आणि बांबू डेव्हलपमेंट बोर्ड यांचे मार्गदर्शन घेतले. मुख्यतः पर्यावरणपूरक, कमी पाणी लागणारी आणि बाजारात मागणी असलेली बांबू शेती निवडली. अगरबत्ती, कोळसा, बायोमास, फर्निचर, पेपर मिल इ. साठी उपयुक्त बांबूच्या 19 जातीची लागवड केली. 7 लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. ड्रिप इरिगेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि सतत नवे प्रयोग यामुळे त्यांची शेती यशस्वी झाली. आज ते अनेक शेतकऱ्यांना बांबू शेती शिकवतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात.
बांबू पिकाची सुरुवात शिवाजी राजपूत यांनी सुरुवातीला पारंपरिक पिकांची शेती केली. मात्र, हवामानातील बदल, अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. त्यांनी आपल्या 25 एकर शेतीवर शाश्वत पद्धतीने बांबू लागवड करून दरवर्षी सुमारे 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक शेतीत सतत हवामानावर अवलंबून राहावे लागते. कधी पाऊस, कधी वारा, कधी संपूर्ण पीक हातचे जाऊ शकते. पण बांबू शेतीत तसा धोका नाही. एकदा लागवड केली की, पहिल्या वर्षानंतर विशेष खर्च न करता सातत्याने उत्पन्न मिळते. त्यांची एकुण 50 एकर जमीन असून त्यांनी 25 एकरांवर बांबूची लागवड केली आहे. उर्वरित जमीन इतर शेतकऱ्यांना भाड्याने दिली आहे. बांबूची लागवड एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक एकरातून दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. म्हणजेच 25 एकरांमधून 25 लाख रुपये दरवर्षी उत्पन्न मिळते.
शेतकऱ्यांना दिला आधार
राजपूत यांनी स्वतःच्या 50 एकर व्यतिरिक्त शिरपूर तालुक्यात 150 एकर जमिनीत इतर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रेरित केले आहे. बांबू हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा पर्याय आहे. कागद, फर्निचर, इंधन, बांधकाम अशा विविध उद्योगांमध्ये त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठीही बांबू महत्त्वाचा ठरतो. शिवाजी राजपूत यांनी पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना दिली आहे.
संपर्क :
शिवाजी राजपूत – 9850103980
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.
तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली? खाली कमेंट करून नक्की कळवा!
टीम ॲग्रोवर्ल्ड