धराक्षा इकोसोल्युशन्स ही दिल्लीजवळील फरीदाबाद स्थित ॲग्री स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी पीक अवशेषांचे आणि पाला पाचोळ्याचे शाश्वत पॅकेजिंगमध्ये रूपांतर करत आहे. 2020 मध्ये स्थापन झालेले धराक्षा इकोसोल्युशन्स शेतकऱ्यांकडून पिकांचे अवशेष जमा करते आणि त्याचे बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग मटेरियलमध्ये रूपांतर करते.
शेतकऱ्यांच्या पीक कचरा जाळण्यातून होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येमुळे वैतागलेल्या राजधानी दिल्लीलाही त्यामुळे मुक्त श्वास घेणे शक्य होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, शार्क टँक इंडिया शो मध्ये जबरदस्त सादरीकरण करून या स्टार्ट-अपने तब्बल 24.8 कोटींची गुंतवणूक (सीड फंडिंग) मिळवली. पॅकेजिंगसाठी पर्यावरणपूरक पर्याय पर्यावरणीय शाश्वततेची चिंता आणि प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या गरजेमुळे देशात पर्यायी पॅकेजिंग उपायांची मागणी वाढत आहे. बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग साहित्य अधिकाधिक प्रचलित होत असताना, वनस्पती तंतूंसारख्या अक्षय स्रोतांपासून मिळवलेले धराक्षाचे कंपोस्टेबल पॅकेजिंग साहित्य कंपोस्टमध्ये विघटनासाठी डिझाइन केलेले आहे. शिवाय, विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी पर्यावरणपूरक पर्याय देते. तीच गरज पूर्ण करण्यासाठी, आनंद बोध आणि अर्पित धुपर यांनी 2020 मध्ये धराक्षा इकोसोल्युशन्सची स्थापना केली. फरिदाबादस्थित हे B2B स्टार्टअप पीक अवशेषांचे बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग साहित्यात रूपांतर करते.
स्वच्छ, प्रदूषणमुक्त हवा हा प्रत्येकाचा हक्क
धराक्षाचे संस्थापक अर्पित धुपर सांगतात की, बोध आणि धुपर हे बीटेक शिकत असताना रूममेट होते. एकमेकांना ओळखत असल्याने आणि 13 वर्षांहून अधिक काळ अनेक प्रकल्पांवर एकत्रित काम केल्यानंतर, या दोघांनी त्यांच्या कौशल्यांना एकत्रित करून एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्या सोडवणारे उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. संस्थापक सांगतात की, “व्यवहार्य पर्यायांच्या अभावामुळे, शेतकरी पुढील कापणीच्या हंगामासाठी त्यांची जमीन तयार करण्यासाठी पीक अवशेष जाळतात. जर शेतकऱ्यांना हा पाला-पाचोळा जाळण्यापासून रोखण्यासाठी पर्यायी पद्धत उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय उपलब्ध झाला तर? याच कल्पनेतून धराक्षाचा जन्म झाला.”
धराक्षा म्हणजे पृथ्वीची रक्षा !
धराक्षा हा शब्द दोन हिंदी मूळ शब्दांपासून बनलेला आहे “धरा” म्हणजे पृथ्वी आणि “रक्षा” म्हणजे बचत, ज्याचा अर्थ पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवणे असा होतो. बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग धराक्षा पीक अवशेषांचे विघटन करण्यासाठी आणि त्यांना पॅकेजिंग मटेरियलमध्ये रूपांतरित करण्यासाठी मायसेलियम, मशरूमच्या मुळाचा वापर करते. यासाठी, त्यांनी मशरूमच्या एका प्रजातीचे संवर्धन केले आहे, जी पीक कचऱ्याचा अन्न म्हणून वापर करते. आम्ही आमची उत्पादने तयार करत नाही, तर आम्ही ती निसर्गातच फुलवतो. धराक्षाचे पॅकेजिंग साहित्य सामान्य मातीत 60 दिवसांत विघटित होऊ शकते आणि तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकते, त्यामुळे ते प्लास्टिक आणि थर्माकोलसाठी पर्यावरणपूरक पर्याय बनते.”
750 टन पीक अवशेषांची खरेदी
धराक्षा शेतकऱ्यांकडून पीक कचऱ्याच्या पेंढ्यांची खरेदी अॅग्रीगेटर्सच्या नेटवर्कद्वारे करते. ते या पेंढ्यांची काळजी घेतात, साठवणूक करतात. त्यामुळे गरजेनुसार पुढे हे साहित्य किफायतशीर पद्धतीने वाहून नेले जाऊ शकते. त्यानंतर हा कच्चा माल कापला जातो, वाफवला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते, त्याचे पॅकेजिंगमध्ये रूपांतर होण्यासाठी 10 दिवस लागतात. पंजाब आणि हरियाणातील 200 किमीच्या परिघात असलेल्या जिल्ह्यांमधून सध्या हे स्टार्ट अप पीक-कचरा पेंढ्यांची खरेदी करत आहे. गेल्या वर्षी, हंगामात, आम्ही 250 एकरपेक्षा जास्त शेतजमिनीतील सुमारे 750 टन पीक अवशेषांची खरेदी केली होती.”
धराक्षाचे उद्दिष्ट पुढील सहा ते सात वर्षांत पीक अवशेष कचरा जाळण्याचे प्रमाण 40% ने कमी करणे आहे. सध्या, त्यांच्याकडे उत्पादन क्षेत्रात 50 सदस्यांची टीम आहे, ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्सचा समावेश आहे, ज्यापैकी 40% महिला कर्मचारी आहेत.
व्यवसाय मॉडेल
सुरुवातीला दोघा संस्थापकांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतून 45 लाख रुपये गुंतवून धराक्षा स्टार्टअप सुरू केला. कंपनीची प्रत्येक उत्पादन शीटची किंमत निश्चित आहे, जी पॅक करायच्या उत्पादनांच्या आकार आणि आकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एका लहान भांड्यासाठी (6 इंचाचा आकार) पॅकेजिंग धराक्षा शीटची किंमत सुमारे 30 रुपये आहे. एका सामान्य काचेच्या भांड्याचे पॅकेजिंग सुमारे 10 रुपयांचे आहे आणि मोठ्या वस्तूच्या पॅकेजिंगसाठी 250 रुपयांपर्यंत किंमत जाऊ शकते. धराक्षा सध्या दरमहा 20,000 शीटस तयार करू शकते. पुढील चार महिन्यांत उत्पादन पाच पट आणि या वर्षाच्या अखेरीस दहा पट वाढवण्याची योजना आहे.
संपर्क:
धराक्षा इकोसोल्यूशन्स, प्लॉट नं -2A, पहिला मजला, KH NO 294, केहर सिंग इस्टेट, साईदुलाजब व्हीलेज, लेन नं. 2, नवी दिल्ली 110030. –
ई-मेल: IANANDBODH@GMAIL.COM (कॉर्पोरेट), ARPITDHUPAR007@GMAIL.COM, ARPIT@DHARAKSHA.COM (अर्पित धुपर), IANANDBODH@GMAIL.COM (आनंद बोध).
मोबाईल: अर्पित धुपर (CEO) : 8851123676
