• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
in हवामान अंदाज
0
हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – सततचा पाऊस, अतिवृष्टी, नुकसान यामुळे कंटाळलेल्या राज्यातील शेतकरी बांधव आणि तमाम जनतेसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक बातमी दिली आहे. रिटर्न मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल असून येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून परतणार असल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजीच नंदुरबारमधून रिटर्न मान्सूनने माघार घेतली होती.

 

आज सकाळी 9 वाजताचे उपग्रह छायाचित्र

आयएमडीच्या ताज्या बुलेटिननुसार, आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून पाऊस परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागासह महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सून माघारी जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. माघारीची रेषा वेरावल, भरूच, उज्जैन, झाशी, शाहजहांपूरमधून जात आहे. त्यामुळे पुढील एक–दोन दिवसात राज्यातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

 

देशभरातील आजचे पावसाचे अनुमान : दक्षिण भारतातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

 

दोन आठवडे आधी येऊनही जाता जाईना!
गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजीच नंदुरबारमधून मान्सूनने माघार घेतली होती. दक्षिण राजस्थान, कच्छमधून 23 सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशातून 15 ऑक्टोबर रोजी मान्सूनने माघार घेतली होती. यंदा मात्र दोन आठवडे आधीच 25 मे रोजीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. 29 जून रोजीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. साधारणतः दरवर्षी 8 जुलै रोजी मान्सून देशभर पोहोचतो. यंदा लवकर सुरू होऊनही तो परतायचे नाव घेत नव्हता. राजस्थानमधून माघारीनंतर गेले दोन आठवडे मान्सूनच्या परतीचा प्रवास ठप्प झाला होता.

मान्सून माघारीची वाटचाल: नकाशातील पांढऱ्या भागातून मान्सून पूर्णतः माघारी गेला आहे. गेले 2 आठवडे स्थिर रेषेपुढे गुजरात आणि मध्यप्रदेशाच्या बहुतांश भागातूनही मान्सून परतत आहे. महाराष्ट्रातील मान्सून परतीची सुरुवात येत्या एक-दोन दिवसांत सुरू होईल. नकाशातील निळ्या रंगाच्या चौकोनाच्या भागातून आता “रिटर्न मान्सून” सुरू होईल. लाल रेषा ही त्या भागातून मान्सून परत जाण्याची सामान्य तारीख आहे.

 

शक्ति चक्रीवादळ, वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा खोडा
यंदा राजस्थानमधून 14 सप्टेंबर रोजी, नियमित वेळीच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. पश्चिम राजस्थानमधून वेळीच माघारी झाली. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर भारताच्या काही भागांमधूनही पाऊस परतला. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या परतीची शक्यता वर्तवली गेली होती. धुंवाधार सप्टेंबरनंतर तर पाऊस नकोसा झाला होता. परंतु, त्यानंतर शक्ति चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि त्यातच जोडीला हिमालयीन वेस्टर्न डिस्टर्बन्सेस यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवसाला ब्रेक लागला. गेल्या 10-12 दिवसांपासून मान्सून विड्रॉवल रेषा म्हणजेच परतीची आगेकूच एकाच जागी खोळंबली होती. त्या प्रवासाला आता गती मिळणार आहे.

 

 

देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स
• उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरूच राहील.
• उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मान्सून परतला, रात्री थंडी पडली, या राज्यांमध्ये आज काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. दिवाळीपूर्वी उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता.

देशातील बहुतांश भागात “करवा चौथ”चा चांद झाकोळलेला राहण्याची शक्यता!

• 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि आंध्रसह अनेक दक्षिणी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे थंडी वाढेल, आयएमडीने जारी केला इशारा.
• पुढील 2-4 दिवस दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम या राज्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी
  • “शक्ति”चा महाराष्ट्राला धोका टळला; चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आयएमडीरिटर्न मान्सून
Previous Post

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

Next Post

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

Next Post
हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish