पूर्वजा कुमावत
निशिगंध हे एक फुलझाड असून त्याची लागवड ही बिजांनी किंवा रूपांनी नाहीतर कंदानी होते. निशिगंधा हे महाराष्ट्रात गुलछडी या नावाने ओळखले जाते. हे फुल व्यापारी पीक म्हणून गणले जाते. निशिगंधचे फुल हे पांढरेशुभ्र असून सुवासिक व गजरा, पुष्पहार, माळा अथवा पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंधांच्या अफलापासून आपण सुगंधी द्रव्य बनवू शकतो.
हवामान व जमीन
या पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. अति थंड हवामान व अति पावसात या पिकाला हानिकारक ठरू शकते. या पिकाला पाणी निचरा होणारी जमीन चांगली मानवते. याला जमिनीचा सामू (PH) हा 3.5 ते 8 दरम्यान लागतो. निशिगंधाची लागवड करत असताना जमिनीत सेंद्रिय खत टाकावे. उथळ व हलक्या जमिनीत फुलदांडे व फुलं ही लहान राहतात आणि त्याचा हंगामही लवकर संपतो. शक्यतो या पिकासाठी चुनखडीयुक्त व हरळी आणि लव्हाळायुक्त जमिनीची निवड करून नये.
लागवड
निशिगंध पिकाची लागवड ही शक्यतो एप्रिल ते मे महिन्यात करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्राउंड वजनाचे कंद निवडावेत व हे कंद मागील वर्षांच्या पिकांपासून निवडावेत. 20 ते 30 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास फुले येण्यास जास्त महिन्यांचा कालावधी लागतो. निवडलेले झिरो पॉईंट दोन टक्के तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 ते 20 मिनिटे बुडवून त्या कंदांची लागवड करावी. लागवडीसाठी सरी-वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. निशिगंधाची लागवड ही 30×30 सेंमी अंतरावर, 5 ते 7 सेंमी खोलीवर करावी. हेक्टरी 70 ते 80 हजार कंद पुरेसे होतात.
खत व्यवस्थापन
हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. 200 किलो नत्र, 150 किलो स्फुरद व 200 किलो पालाश द्यावे. लागवडीपूर्वी शेणखत हे जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश द्यावे. उरलेले 150 किलो नत्र हे तीन समान आठवड्यात लागवडीनंतर 30 60 व 90 दिवसांनी द्यावे. या पिकाच्या लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी ॲझोस्पिरीलम 100 किलो ओलसर शेणखातात मिसळावे. या मिश्रणाला एकत्र करून प्लास्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशा प्रकारे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत आणि ट्रायकोडर्मा 10 किलो, 100 किलो ओलसर शेणखताचे वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर हे तिन्ही मिश्रण एकत्र मिसळून निशिगंधाच्या पिकास द्यावे.
पाणी व्यवस्थापन
या पिकाच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस नसल्यास 10 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 8 ते 12 दिवसांनी तर उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी जमिनीला नियमित पाणी द्यावे. फुलांचे दांडे सुरू झाल्यास नियमित पाणी द्यावे. लागवड केल्यापासून तीन ते चार महिन्यात वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवावी जेणेकरून पिकाची वाढही जोमात होते व उत्पन्नही चांगले मिळते.
प्रकार व जाती
निशिगंधांच्या फुलांच्या पाकळ्यांची संख्या आणि पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमिडबल, व व्हेरिगेटेड असे प्रमुख चार निशिगंधात आहेत. सिंगल प्रकारामध्ये श्रृंगार, प्रज्वल या जाती आहेत. सिंगल पाकळीचे फुलं माळ, गजरा यासाठी वापरले जातात. डबल प्रकारांमध्ये सुहासिनी, वैभव या जाती आहेत. व्हेरिगेटमध्ये सुवर्ण रेखा रजत रेखा व सिक्कीम या जाती आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇