पूर्वजा कुमावत, शेंदुर्णी
बीजामृत हे एक प्राचीन जैविक सूत्रीकरण आहे, जे जैविक आणि प्राकृतिक शेतीमध्ये बीजांच्या उपचारासाठी वापरले जाते. भारतामध्ये हा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आजकाल बहुतेक शेतकरी अजैविक पद्धतीने शेती करतात, परंतु जैविक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. जैविक पद्धतीने बीजांची लागवड केल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असते.
बीजामृताचे फायदे
नवीन मुळांची सुरक्षा वाढवते, ज्यामुळे ते आजारांपासून सुरक्षित राहतात. बीजांवर सूक्ष्मजीवांचा लेप तयार होतो, ज्यामुळे रोपांची सुरक्षा वाढते. पावसाळ्यानंतर होणाऱ्या आजारांपासून बीजांना सुरक्षा मिळते. बियाण्याची अंकुरण क्षमता वाढते. विविध रोगांपासून संरक्षण करून उगवण शक्ती वाढवते. बीजाची अनुकूलता वाढवते, ज्यामुळे वनस्पतींच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. पीक टक्केवारी सुधारते.
लागणारे साहित्य:
गाईचे शेण – 5 किलो
गाईचे व म्हशीचे गोमूत्र – 5 लिटर
दूध – 100 मि.ली.
चुना – 50 ग्रॅम
वडाखालील किंवा शेतातील माती – 500 ग्राम
ट्रायकोडर्मा व्हिरीडी – 100 ग्रॅम
बीजामृत तयार करण्याची प्रक्रिया:
5 किलो गाईचे शेण कापडामध्ये बांधून 20 लिटर पाण्यात 24 तास ठेवावे.
एक लिटर पाण्यामध्ये 50 ग्राम चुना मिसळून रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी, कापडामध्ये बांधलेली शेण पिळून घ्या आणि त्यामध्ये 500 ग्राम माती मिसळा.
त्यात ट्रायकोडर्मा व्हिरीडी 100 ग्रॅम टाका.
5 लिटर गाईचे गोमूत्र आणि चुन्याचे द्रावण एकत्र पाणी मध्ये मिसळा आणि चांगले ढवळून घ्या.
हे मिश्रण बीजामृत तयार झाले.
बीजामृत वापरण्याची पद्धत
बीजामृतात पिकाचे बियाणे हाताने व्यवस्थित मिसळा. नंतर बियाणे सुकवून पेरणी करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
सोनचाफ्याच्या शेतीतून शेतकऱ्याला भरघोस नफा !
अस्सल इंद्रायणी.. दुसऱ्या गाडीचीही बुकिंग सुरु… (फक्त 80 कट्टे; बुकिंग सुरू)